महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामांसाठी रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बो मेगाब्लॉक, तर मध्य आणि हार्बर मर्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान या तीनही मार्गावरील काही सेवा रद्द करण्यात येणार आहेत. तसेच या मार्गावरील वाहतूक वेळापत्रकापेक्षा १५ ते २० मिनिटे उशिराने धावणार आहे. ’पश्चिम रेल्वे’कुठे? – अंधेरी ते बोरिवली दरम्यान पाचव्या मार्गावर.’कधी? – सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वा.’परिणाम – जम्बो मेगाब्लॉकदरम्यान अंधेरी ते बोरिवली यादरम्यान काही अप व डाउन मार्गावरील लोकलगाडय़ा रद्द करण्यात येणार आहेत. ल्ल ल्ल ल्ल’मध्य रेल्वे’कुठे? – मुलुंड ते माटुंगा अप धिम्या मार्गावर.’कधी? -सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५ वा.’परिणाम – ब्लॉकदरम्यान ठाण्याहून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.१२ या काळात अप धिम्या मार्गावरील गाडय़ा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान जलद अप मार्गावरुन सोडण्यात येणार आहेत. या गाडय़ा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकावर थांबतील आणि त्यानंतर त्या अप धिम्या मार्गावरुन चालतील. अप धिम्या मार्गावरील सेवा नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकावर उपलब्ध नसेल. त्यामुळे या स्थानकांवरील प्रवाशांना भांडुप, विक्रोळी आणि कुर्ला स्थानकावरुन प्रवास करण्यास अनुमती देण्यात आली आहे.ल्ल ल्ल ल्ल’हार्बर रेल्वे’कुठे? मशिद ते चुनाभट्टी आणि वडाळा रोड ते माहीम अप आणि डाऊन मार्गावर.’कधी? – अप मार्गावर सकाळी १०.४५ ते दुपारी ४.४४ वा. डाऊन मार्गावर स. ११ ते सायं. ५.’परिणाम – ब्लॉकदरम्यान मुंबई सीएसटी ते वाशी / बेलापूर /पनवेल दरम्यानची डाऊन वाहतूक स. १०.३१ ते सायं. ५.०८ दरम्यान बंद असेल. तसेच ब्लॉकदरम्यान अप मार्गावरील पनवेल / बेलापूर / वाशीहून सीएसटीला जाणारी अप मार्गावरील स. ९.२० ते दु. ४.१४ या काळात पूर्णपणे बंद असेल.

Story img Loader