मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

कुठे : माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० पर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.

हेही वाचा…मुंबईची हवा ‘मध्यम’ श्रेणीत, मालाड येथील हवा ‘वाईट’

ट्रान्स हार्बर मार्ग

कुठे : ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेल/नेरूळ/वाशी ते ठाणे स्थानकांदरम्यान अप व डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

हेही वाचा…आयआयटी मुंबईमध्ये ‘गर्भविज्ञान’ कार्यक्रमावर विद्यार्थ्यांचा आक्षेप

पश्चिम रेल्वे

कुठे : भाईंदर – बोरिवली दरम्यान अप जलद मार्गावर
कधी : सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत विरार/वसई रोड – बोरिवलीदरम्यान अप जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या अप मार्गावर वळवण्यात येतील. या कालावधीत काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

Story img Loader