मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील रूळ, ओव्हर हेड वायरची दुरुस्ती आणि देखभाल; तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे करण्यासाठी येत्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर, हार्बर मार्गावरील सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी – सांताक्रूझदरम्यान ‘मेगाब्लॉक’ घेण्यात येणार आहे.

mumbai local mega block on central railway
Mumbai Local : मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
Railway ticket inspector, passenger saved,
मुंबई : तिकीट तपासनीसाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाला जीवदान
What is the solution to the Ghodbunder road traffic
घोडबंदर रस्त्याच्या कोंडीवर उपाय काय? नवे ठाणे कोंडीचे का ठरू लागलेय? 
Saturday night block, Central Railway, Railway,
मध्य रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक
Sunday Block on Central Railway, Railway Block,
मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक
22 local trains on Western Railway cancelled
Mumbai Local : पश्चिम रेल्वेवरील २२ लोकल फेऱ्या रद्द

मध्य रेल्वे :
कुठे – मुलुंड – माटुंगा अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी – सकाळी ११.५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

परिणाम – ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकल माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड – माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. माटुंग्यानंतर त्या पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर रेल्वे :
कुठे – सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर
कधी – सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० पर्यंत

परिणाम – ब्लॉक कालावधीत सीएसएमटी आणि वडाळा येथून वाशी, बेलापूर आणि पनवेलकरिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे तसेच गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. तर, पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहील. ब्लॉक काळात पनवेल आणि कुर्लादरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल फेरी धावेल. ही लोकल फेरी कुल्र्यावरून फलाट क्रमांक ८ वरून चालवण्यात येईल.

पश्चिम रेल्वे

कुठे – जोगेश्वरी – सांताक्रूझ आणि पाचव्या मार्गिकेवर
कधी – सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत

परिणाम – ब्लॉक कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील. तसेच पाचव्या मार्गिकेवर सांताक्रूझ – जोगेश्वरीदरम्यान ब्लॉकमुळे मेल – एक्स्प्रेस आणि लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होईल.