मुंबई महानगरपालिकेच्या तरण तलावांची सभासद क्षमता पूर्ण झाल्यामुळे नोंदणी बंद करण्यात आली होती. मात्र आता नव्या वर्षामध्ये चारही तरण तलावांतील सभासद नोंदणी ३ जानेवारी २०२३ पासून सुरू करण्यात येणार आहे. भविष्यात चार तरण तलावांसाठी त्रैमासिक व मासिक सदस्यत्वही देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. इतकेच नव्हे तर सभासदांना दैनिक शुल्क भरून त्याच्यासोबत एका पाहुण्याला पोहण्यासाठी नेता येणार आहे. सदस्यत्व मिळू न शकणाऱ्यांसाठी ऑनलाईन प्रतीक्षायादीचा पर्याय खुला करण्यात आला आहे. तरण तलावासाठी आतापर्यंत केवळ वार्षिक सदस्यत्व देण्यात येत होते.

हेही वाचा- महानगरपालिका मुंबईत सात ठिकाणी जलतरण तलाव बांधणार

shiv sena shinde group claim 73 thousand duplicate voters in navi mumbai
गावाकडच्या दुबार मतदारांमुळे नवी मुंबईत खळबळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
Zopu scheme, MHADA developer, MHADA,
‘झोपु’ योजनेत म्हाडा विकासक, पहिल्यांदाच जबाबदारी; चार प्रस्ताव प्राधिकरणाकडे
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील चार जलतरण तलावांचे सभासदत्व घेण्याच्या पद्धतीत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने ऑनलाईन सभासद नोंदणी प्रणाली विकसित करण्यात आली असून नागरिकांसाठी ती २३ ऑगस्ट २०२२ पासून खुली करण्यात आली होती. सभासदत्वाची क्षमता पूर्ण झाल्याने नोंदणी प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र आता ३ जानेवारी २०२३ पासून सभासद नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याची माहिती उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली.

हेही वाचा- मुंबई अग्निशमन दलात ९१० पदांवर भरती ;१३ जानेवारीपासून सुरू होणार भरती प्रक्रिया

सभासदांसाठी असलेली पूर्वीची ४५ मिनिटांची वेळ वाढवून ६० मिनिटे करण्यात आली आहे. वार्षिक सभासदत्व प्राप्त झालेल्या व्यक्तीला काही कारणास्तव सभासदत्व नको असल्यास, ते परत करण्याची सुविधा आता उपलब्ध करण्यात आली आहे. प्रत्येक सभासदाला त्याच्या सभासदत्वाचा तपशील पाहण्यासाठी स्वतंत्र लॉग-इन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कुठे करायची नोंदणी

https://swimmingpool.mcgm.gov.in/ या संकेतस्थळासह मुंबई महानगर पालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर (होम पेज) जलतरण तलाव वार्षिक सदस्यत्व नोंदणीची ‘लिंक’ देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर उघडणाऱ्या वेब पेजवर ऑनलाईन अर्ज भरताना इतर प्राथमिक माहितीसह आपला आधार क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे. अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन शुल्क भरणा करावा लागेल. हे ऑनलाईन शुल्क वार्षिक, त्रैमासिक, मासिक आणि दैनंदिन या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर व ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरणा केल्यानंतर निर्धारित कालावधीत जलतरण तलावाच्या कार्यालयात वैद्यकीय प्रमाणपत्र, आधारकार्ड व शुल्क भरल्याचा पावती क्रमांक सादर करावयाचा आहे. या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर अर्जदाराचे सभासदत्व सक्रिय केले जाणार आहे.

हेही वाचा-

अशी आहे शुल्करचना

तरण तलावाच्या आकारानुसार वेगवेगळी शुल्क रचना असून या अंतर्गत वार्षिक शुल्क आठ हजार रुपये ते दहा हजार रुपये इतके आहे. तर त्रैमासिक शुल्क दोन हजार २३० रुपये ते दोन हजार ९०० रुपये इतके आहे. मासिक शुल्क एक हजार ३०० रुपये इतके असून सभासदासोबत येणाऱ्या पाहुण्यांसाठी २४० रुपये दैनिक शुल्क आकारण्यात येईल. वार्षिक सभासदत्व उपलब्ध नसल्यास ५०० रुपये शुल्क भरून प्रतीक्षायादीत नाव नोंदविता येईल.

तरण तलावांच्या वेळा

सर्व तरण तलावांच्या वेळा या सकाळी ६.०० ते ११.०० व सायंकाळी ६.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत असेल. महिला सभासदांसाठी राखीव सत्र सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० आणि सायंकाळी ५.०० ते ६.०० अशी असेल. सत्र पद्धत बंद करण्यात आली असून सभासद तरण तलावांच्या वेळांमध्ये तरण तलावाच्या क्षमतेनुसार केव्हाही येऊ शकतो.

हेही वाचा-

संपूर्ण तलावही आरक्षित करता येणार

प्रासंगिक तत्वावर तरण तलाव सुविधा वापरणाऱ्या अभ्यागतांसाठी विशेष नोंदणी सुविधा असेल. दुपारी १.०० ते ४.०० या कालावधीत संपूर्ण तरण तलाव आरक्षित करण्याची सुविधा असणार असून यासाठी प्रति तास २० हजार ४३० रुपये इतके शुल्क असणार आहे.