पेला अर्धा सरला आहे, असंसुद्धा म्हणता येतं., पेला अर्धा भरला आहे, असंसुद्धा म्हणता येतं.
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा आता कसं जगायचं
मंगेश पाडगावकर यांच्या निधनामुळे मर्ढेकरांच्या कारकीर्दीतली एक महत्त्वाची व्यक्ती आज आपल्यातून निघून गेली. मर्ढेकरांनंतर पाडगावकर आले आणि १९५० साली त्यांचा ‘धारानृत्य’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्या काळात मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, वसंत बापट असे त्रिकूट महाराशष्ट्रात ओळखले गेले. या त्रिकुटाने गावोगावी जाऊन काव्यवाचन केले आणि नवीन मराठी कविता लोकांपर्यंत पोहोचवली. अर्थात कवितेविषयी ज्यांना प्रेम आहे, अशांसाठी त्यांनी अतिशय महत्त्वाचे काम केले. मात्र, त्या काळात असा समज, ग्रह झाला होता की नवीन कवींचे काव्य लोकांना कळत नाही, ते दुबरेध आहे आणि रसिक त्यापासून दुरावले आहेत. हा समज मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट यांनी दूर केला. ग्रह खोडून काढला. मराठी साहित्याच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.
मंगेश केशव पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी वेंगुर्ले येथे झाला. मराठी आणि संस्कृत विषय घेऊन ‘एम.ए’ झालेल्या पाडगावकर यांनी दोन वर्षे महाविद्यलयात अध्यापक म्हणूनही काम केले होते. १९५३ ते १९५५ ही दोन वर्षे पाडगावकर यांनी ‘साधना’ साप्ताहिकात सहसंपादक म्हणून काम केले. मुंबई आकाशवाणीवर १९६४ ते १९७० या कालावधीत निर्माता म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सव्‍‌र्हिस-युसीस येथे मराठी विभागाचे प्रमुख संपादक म्हणून काही वर्षे काम केल्यानंतर १९८९ मध्ये ते निवृत्त झाले.
मराठी कविता लोकप्रिय करण्यात आणि काव्य वाचन कार्यRमांच्या माध्यमातून ती समाजाच्या सर्व स्तरात पोहोचविण्यात पाडगावकर यांचे मोठे योगदान आहे. विंदा करंदीकर, वसंत बापट आणि पाडगावकर यांनी काव्यवाचनाचे कार्यRम करुन महाराष्ट्र ढवळून काढल होता. कवितावाचन व सादरीकरणाची पाडगावकर यांची स्वताची एक स्वतंत्र शैली होती. काव्यवाचन आणि सादरीकरणावर त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटविला होता.
दांभिकतेवर प्रहार
पाडगावकर यांनी ‘गझल’, ‘विदुषक’, ‘सलाम’ या काव्यसंग्रहातून राजकीय आशयाची व उपरोधिकपणा असलेली समाजातील विसंगतीवर प्रहार करणारी कविता केली. सत्तेच्या संपर्कात राहणाऱ्या वर्गातील लोकांनी सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रातील माणसांचा केलेला मानभंग, मध्यमवर्गीयांमध्ये आलेली लाचारी, दांभिकता याबद्दल पाडगावकर यांच्या मनात संताप होता तो या कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त झाला आहे. १९६० नंतरच्या वास्तवावर भेदकपणे प्रकाश टाकणारी पाडगावकर यांची कविता नवसमृद्ध वर्गाची, त्याच्या संवेदनाहिन मनाची चिरफाड करुन वाचकांना अंतर्मुख करते.
ललित लेखन, साहित्य
१९५३ मध्ये पाडगावकर यांचा ‘निंबोणीच्या झाडामागे’हा ललितलेख निबंधसंग्रह प्रकाशित झाला होता. ‘बोरकरांची कविता’, ‘विंदा करंदीकर यांची निवडक कविता’ हे त्यांनी संपादित केलेले काही महत्वपूर्ण ग्रंथ आहेत. ‘जिप्सी’, ‘छोरी’, ‘उत्सव’ या काव्यसंग्रहातील कवितांमधून दिसणारा निसर्ग व प्रेम त्यांच्या ‘श्रावणात घननिळा बरसला’ या सारख्या भावगीतांमधून अधिक तरलपणे व्यक्त झाला होता. पाडगावकर यांनी ’बायबल’ग्रंथाचा मराठी अनुवाद केला होता.

आमचा जिवलग मित्र आणि एक चांगला माणूस हरवला. हे दुख: कधीही भरुन निघणार नाही. सतत नव्या गोष्टींचा शोधात असणारे अद्भूत व्यक्तीमत्व पाडगावकरांचे होते. त्यांचा आवाज सतत लक्षात राहतो. कवित्व आणि विद्वत्व असूनही त्यांनी कधीही त्याचे प्रदर्शन केले नाही. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या कवितेने वेड लावणारा सगळ्यांचाच मित्र परत येणार नाही. याचे दुख: प्रचंड आहे.
-डॉ. विजया राजाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक

Police Create Reel with Colleagues
पोलीस अधिकाऱ्याने सहकाऱ्यांबरोबर बनवली Reel, नेटकऱ्यांचे जिंकले मन, पाहा Viral Video
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Meenakshi Seshadri Romantic rain song while she having diarrhea
सेटवर एकच शौचालय, पावसात रोमँटिक गाण्याचं शूटिंग अन्.., मीनाक्षी शेषाद्रीने सांगितला अतिसार झाल्यावर चित्रीकरणाचा वाईट अनुभव
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
Boy Spoils Sister's Rangoli Caught on CCTV
संधी साधली अन् बहिणीने काढलेली रांगोळी खराब केली, पण अशी झाली पोलखोल, VIDEO एकदा पाहाच
loksatta satire article sujay vikhe patil
उलटा चष्म: पातेले कलंडलेच..
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

पाडगावकरांनी अनेक कवींना लिहीत केलं त्यांना स्फूर्ती दिली. मराठीत नवनवीन काव्यप्रकार आणले. पाडगावकर जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या कवितेमुळे ते कायम आपल्यात राहतील. मात्र यापुढे त्याचे काव्य त्यांच्या तोंडून ऐकता येणार नाही. याचे प्रचंड दुख: मनात कायम राहिल आहे.
-रामदास भटकळ, पॉप्युलर प्रकाशन

पाडगावकरांनी मराठी काव्यक्षेत्रात समृद्धी आणली. प्रेम कविता आणि पाडगावकर यांचे एक समीकरण तयार झाले. त्यांच्या निधनाने आनंदयात्री हरपला.
-अशोक बागवे, कवी
गेली चाळीस वर्षे मला पाडगावकरांचे स्नेह मिळाले. पाडगावकरांचे निघून जाणे म्हणजे मराठी कवितेचा बाप गेल्याप्रमाणे आहे. त्यांच्या मैफिलीत येणारी व्यक्ती त्यांच्या प्रेमात पडत असे. आमच्यात वयाचे अंतर असूनही त्यांनी कधीही तसे भासू दिले नाही.
– गंगाराम गवाणकर, नियोजित अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन
काव्यसंपदा
‘धारानृत्य’हा पाडगावकर यांचा पहिला काव्यसंग्रह १९५० मध्ये प्रकाशित झाला. सुरुवातीच्या काळात पाडगावकर यांच्या कवितेवर ज्येष्ठ कवीवर्य बा.भ. बोरकर यांचा ठसा होता. नंतर त्यांनी भावकाव्य शैलीत आणि स्वतंत्रपणे काव्यलेखन सुरु केले. ‘जिप्सी’ (१९५२), ‘छोरी’ (१९५४), ‘उत्सव’ (१९६२), ‘विदुषक’ (१९६६), ‘सलाम’ (१९७८), ‘गझल’ (१९८३), ‘भटके पक्षी’ (१९८४), ‘बोलगाणी’ (१९९०) हे पाडगावकर यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच ‘सुट्टी एके सुट्टी’, ‘आता खेळा नाचा’, ‘उदासबोध’, ‘त्रिवेणी’, ‘राधा’, ‘मोरु’, ‘गिरकी’ आदी काव्यसंग्रही प्रकाशित झाले आहेत.

Capture