पेला अर्धा सरला आहे, असंसुद्धा म्हणता येतं., पेला अर्धा भरला आहे, असंसुद्धा म्हणता येतं.
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा आता कसं जगायचं
मंगेश पाडगावकर यांच्या निधनामुळे मर्ढेकरांच्या कारकीर्दीतली एक महत्त्वाची व्यक्ती आज आपल्यातून निघून गेली. मर्ढेकरांनंतर पाडगावकर आले आणि १९५० साली त्यांचा ‘धारानृत्य’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्या काळात मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, वसंत बापट असे त्रिकूट महाराशष्ट्रात ओळखले गेले. या त्रिकुटाने गावोगावी जाऊन काव्यवाचन केले आणि नवीन मराठी कविता लोकांपर्यंत पोहोचवली. अर्थात कवितेविषयी ज्यांना प्रेम आहे, अशांसाठी त्यांनी अतिशय महत्त्वाचे काम केले. मात्र, त्या काळात असा समज, ग्रह झाला होता की नवीन कवींचे काव्य लोकांना कळत नाही, ते दुबरेध आहे आणि रसिक त्यापासून दुरावले आहेत. हा समज मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट यांनी दूर केला. ग्रह खोडून काढला. मराठी साहित्याच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.
मंगेश केशव पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी वेंगुर्ले येथे झाला. मराठी आणि संस्कृत विषय घेऊन ‘एम.ए’ झालेल्या पाडगावकर यांनी दोन वर्षे महाविद्यलयात अध्यापक म्हणूनही काम केले होते. १९५३ ते १९५५ ही दोन वर्षे पाडगावकर यांनी ‘साधना’ साप्ताहिकात सहसंपादक म्हणून काम केले. मुंबई आकाशवाणीवर १९६४ ते १९७० या कालावधीत निर्माता म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सव्र्हिस-युसीस येथे मराठी विभागाचे प्रमुख संपादक म्हणून काही वर्षे काम केल्यानंतर १९८९ मध्ये ते निवृत्त झाले.
मराठी कविता लोकप्रिय करण्यात आणि काव्य वाचन कार्यRमांच्या माध्यमातून ती समाजाच्या सर्व स्तरात पोहोचविण्यात पाडगावकर यांचे मोठे योगदान आहे. विंदा करंदीकर, वसंत बापट आणि पाडगावकर यांनी काव्यवाचनाचे कार्यRम करुन महाराष्ट्र ढवळून काढल होता. कवितावाचन व सादरीकरणाची पाडगावकर यांची स्वताची एक स्वतंत्र शैली होती. काव्यवाचन आणि सादरीकरणावर त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटविला होता.
दांभिकतेवर प्रहार
पाडगावकर यांनी ‘गझल’, ‘विदुषक’, ‘सलाम’ या काव्यसंग्रहातून राजकीय आशयाची व उपरोधिकपणा असलेली समाजातील विसंगतीवर प्रहार करणारी कविता केली. सत्तेच्या संपर्कात राहणाऱ्या वर्गातील लोकांनी सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रातील माणसांचा केलेला मानभंग, मध्यमवर्गीयांमध्ये आलेली लाचारी, दांभिकता याबद्दल पाडगावकर यांच्या मनात संताप होता तो या कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त झाला आहे. १९६० नंतरच्या वास्तवावर भेदकपणे प्रकाश टाकणारी पाडगावकर यांची कविता नवसमृद्ध वर्गाची, त्याच्या संवेदनाहिन मनाची चिरफाड करुन वाचकांना अंतर्मुख करते.
ललित लेखन, साहित्य
१९५३ मध्ये पाडगावकर यांचा ‘निंबोणीच्या झाडामागे’हा ललितलेख निबंधसंग्रह प्रकाशित झाला होता. ‘बोरकरांची कविता’, ‘विंदा करंदीकर यांची निवडक कविता’ हे त्यांनी संपादित केलेले काही महत्वपूर्ण ग्रंथ आहेत. ‘जिप्सी’, ‘छोरी’, ‘उत्सव’ या काव्यसंग्रहातील कवितांमधून दिसणारा निसर्ग व प्रेम त्यांच्या ‘श्रावणात घननिळा बरसला’ या सारख्या भावगीतांमधून अधिक तरलपणे व्यक्त झाला होता. पाडगावकर यांनी ’बायबल’ग्रंथाचा मराठी अनुवाद केला होता.
भावकाव्याचे ‘धारानृत्य’
पेला अर्धा सरला आहे, असंसुद्धा म्हणता येतं., पेला अर्धा भरला आहे, असंसुद्धा म्हणता येतं.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-12-2015 at 03:15 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Memories of mangesh padgaonkar