Ratan Tata: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली. गुरुवारी अतिशय दुःखद वातावरणात रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटी आणि त्यांना माननारे सामान्य लोक मोठ्या संख्येने वरळी येथे उपस्थित होते. यावेळी ऋषिकेश सिंह नावाचा ३९ वर्षीय वर्तमानपत्र विक्रेताही तिथे उपस्थित होता. ऋषिकेश सिंह २० वर्ष रतन टाटा यांच्या निवासस्थानी वर्तमानपत्र पोहोचते करण्याचे काम करत होता. टाटा रोज १४ वर्तमानपत्र घेत असल्याची आठवण ऋषिकेशने सांगितली. तसेच त्याच्या अडचणीच्या काळात त्यांनी त्याला कशी मदत केली, याचीही माहिती त्याने दिली.

पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना ऋषिकेश सिंह म्हणाला, “रतन टाटा हे चांगले व्यक्ती होते. गरीबांचे तर ते कैवारी होते.” रतन टाटा यांच्या कुलाबा येथील बख्तावर इमारतीमध्ये २००१ पासून वर्तमानपत्र देण्याचे काम ऋषिकेश करत होता. त्यानंतर टाटा शेजारीच असलेल्या बंगल्यात स्थलांतरीत झाले होते.

eknath shinde
Ratan Tata Death : “नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश अन् समाजाचा विकास करण्याची विचारधारा…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रतन टाटांना वाहिली श्रद्धांजली!
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Nagpur, Ganga Jamuna nagpur, Police transfered,
नागपूर : ‘रेड लाइट एरिया’तील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यांची अखेर उचलबांगडी; लोकसत्ताच्या वृत्ताची दखल
Sachin Tendulkar and his family at Union Minister Nitin Gadkari Nagpur residence
तेंडुलकर कुटुंबासह पोहोचला गडकरींच्या घरी…गडकरींनी दिला एकच सल्ला…
sanjay shinde who killed akshay shinde in an encounter get discharged from hospital
अक्षय शिंदे याला चकमकीत ठार करणाऱ्या संजय शिंदे यांना डिस्चार्ज
sushma andhare devendra bhuyar
“तीन नंबरची गाळ मुलगी शेतकऱ्यांच्या पोरांना…”; आमदार देवेंद्र भुयार महिलांविषयी जे बोलले त्यामुळे…
mp naresh mhaske marathi news
आनंद दिघेंप्रमाणेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या काळात न्याय मिळाला – खासदार नरेश म्हस्के
bjp minister ravindra chavan target over potholes issues by publish banner on birthday
डोंबिवलीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाची टिंगल करणारे फलक लावणाऱ्यांविरुध्द गुन्हा

हे वाचा >> Video: …अन् रतन टाटा यांच्या पार्थिवाजवळ जाऊन बसला त्यांचा पाळीव श्वान, शांतनूने सांभाळलं; पाहा व्हिडीओ

ऋषिकेश सिंह म्हणाला की, मी सकाळी वर्तमानपत्र पोहोचते केल्यानंतर रतन टाटा बंगल्यातील हिरवळीवर बसून वर्तमानपत्र वाचायचे. माझ्याकडे बघून नेहमीच ते स्मितहास्य करत असत. कधी कधी ते माझी विचारपूस करायचे. त्यांचा तो प्रेमळ संवाद माझ्या मनावर कायमचा कोरला गेला आहे.

कर्करोगाच्या उपचारासाठी केली मदत

ऋषिकेश सिंहच्या एका नातेवाईकाला काही दिवसांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. याची माहिती ऋषिकेशने रतन टाटा यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याला मदत केली. टाटा मेमोरियल केंद्राकडून लवकर उपचार व्हावेत, यासाठी त्यांनी पत्र लिहिले. तसेच ऋषिकेशला पाच लाख रुपयांची मदत दिली.

हे ही वाचा >> रतन टाटा तरुणपणी कसे दिसायचे? पाहा त्यांचे ‘हे’ १० दुर्मिळ फोटो अन् त्यामागच्या आठवणी

करोना महामारीने सर्व बदलले

करोना महामारीदरम्यान रतन टाटा यांचे वाचन कमी झाले, असे ऋषिकेश सिंहने सांगितले. करोना महामारीदरम्यान टाटा यांनी १४ वृत्तपत्र घेणे बंद केले. या काळात ते केवळ दोन वृत्तपत्र वाचत होते. तेही त्यांना टाटा ग्रुपच्या ताजमहल हॉटेलमधून एका कागदाच्या पिशवीतून येत असत. गुरुवारी (दि. १० ऑक्टोबर) ऋषिकेशने आपल्या वृत्तपत्र डिलिव्हरीचे काम झाल्यानंतर कुलाबा येथील टाटांच्या निवासस्थानी धाव घेतली. याठिकाणी जमलेल्या शेकडो लोकांमध्ये तोही सामील झाला.

याच गर्दीत हुसैन शेख (५७) नावाचा व्यक्तीही होता. टाटा यांच्या मर्सिडीज गाडीची साफसफाई करण्याचे काम शेख अनेकवर्षांपासून करत होता. हुसैन शेखच्या मुलीच्या लग्नासाठी रतन टाटा यांनी ५०,००० रुपये दिले होते.