मुंबई : हवमान विभागाने मुंबईत गुरुवारी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र, गुरुवारी संपूर्ण दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाड्याने मुंबईकरांची काहिली झाली. दरम्यान, हवामान खात्याने मुंबईत ऑगस्टमध्ये पडणाऱ्या पावसासंदर्भात व्यक्त केलेले अंदाज फोल ठरले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा मोसमी पाऊस वेळेवर दाखल झाला. जुलै महिन्यात संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळला. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने विश्रांती घेतली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस पडलाच नाही. त्यानंतर पाऊस सक्रिय होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. मात्र सगळे अंदाज फोल ठरवत पावसाने दडी मारली आहे. यामुळे मुंबईत हवी तितकी पावसाची नोंद झालेली नाही.

हेही वाचा >>>‘मेट्रो १’मधून १० वर्षांत १०० कोटी प्रवाशांचा प्रवास

दरम्यान, हवामान विभागाने मुंबईत गुरुवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात मात्र मुंबईत दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाड्यामुळे अस्वस्थता जाणवत होती. ऑगस्टमध्ये मुसळधार पावसाची अपेक्षा होती. मात्र अधून मधून पडणाऱ्या हलक्या सरींवर मुंबईकरांना समाधान मानावे लागत आहे.

दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण, विदर्भात पावसाचा जोर राहील, तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meteorological department has failed to forecast mumbai stormy rain mumbai print news amy