आतापर्यंत प्रामुख्याने शेती व हवाई वाहतुकीपुरती मर्यादित असलेली हवामान खात्याची सेवा स्थानिक पातळीवर जनसामान्यांसाठी खुली करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरात सफर प्रकल्पांतर्गत ३० केंद्रे उभी करण्यात आली आहेत. उपनगरातील हवामानाचा आणि प्रदूषणाच्या घटकांची नोंद करून त्याची माहिती १३ ठिकाणी सार्वजनिक स्थळांवर इलेक्ट्रॉनिक माहिती फलकाद्वारे मिळेल. नवी दिल्ली व पुणे यानंतर मुंबईत सुरू झालेल्या या सेवेचे उद्घाटन मंगळवारी केले जाणार आहे.
पाऊस आणि तापमान या दोन्हीबाबत मुंबईकर कमालीचे जागरूक झाले आहेत. त्याचसोबत कार्बन, सल्फर, धूलिकण या प्रदूषणकारी घटकांबाबतही जागृती येत आहे. हवाई वाहतुकीसाठी सांताक्रूझ येथे व नौदल तसेच तेलविहिरींसाठी कुलाबा येथे उभारण्यात आलेल्या केंद्रांमधून मुंबईकरांना तापमान व पावसाची माहिती आतापर्यंत मिळत आहे. मात्र प्रत्येक उपनगरात तापमान व पावसासह हवामानातील विविध घटकांची नोंद घेण्यासाठी ३० केंद्रे उभारण्यात आली आहेत. यातील १० केंद्रे ही मुख्यत्वे हवामानातील प्रदूषण करणाऱ्या घटकांची नोंद करतील व त्यात हवामानाचे घटक मोजण्याचीही यंत्रणा असेल. उर्वरित २० ही स्वयंचलित हवामान केंद्र आहेतही केंद्रे उभारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सहकार्य केले आहे. भूविज्ञान मंत्रालय, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपकिल मेटेरोलॉजी, पुणे (आयआयटीएम) आणि मुंबई महापालिका यांनी एकत्रितरीत्या सुरू केलेल्या ‘सफर- मुंबई’ या प्रकल्पांतर्गत मोबाइलवर सफर एअर हे अॅपही सुरू केले आहे.
आंतरराष्ट्रीय निकषांनुसार ही केंद्रे उभारण्यात आली आहेत. ही माहिती मुंबईकरांना १३ माहिती फलकांमधून मिळू शकेल. तसेच हवामानाचे पूर्वानुमान काढणेही शक्य होणार आहे, अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
‘मुंबई-सफर’चे उद्या उद्घाटन
आतापर्यंत प्रामुख्याने शेती व हवाई वाहतुकीपुरती मर्यादित असलेली हवामान खात्याची सेवा स्थानिक पातळीवर जनसामान्यांसाठी खुली करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरात सफर प्रकल्पांतर्गत ३० केंद्रे उभी करण्यात आली आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-06-2015 at 12:30 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meteorological department open 30 automatic centers in mumbai to know climate and pollution