मुंबई : मागील तीन-चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून याचा फटका रेल्वे सेवेला बसला आहे. लोकलचा बुधवारी मोठा खोळंबा झाला होता. मात्र रेल्वे सेवा विस्कळीत झालेली असतानाच पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मेट्रोचा आधार मिळाला. दहिसर – अंधेरी पश्चिम आणि दहिसर – गुंदवली, अंधेरी पूर्व असा प्रवास करण्यासाठी अनेक प्रवाशांनी ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ला पसंती दर्शवली. या दोन्ही मार्गिकांवरून बुधवारी तब्बल दोन लाख १४ हजार ७० प्रवाशांनी प्रवास केला.

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ या मार्गिकांचा पहिला टप्पा एप्रिल २०२२ मध्ये, तर दुसरा टप्पा १९ जानेवारी २०२३ रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला. पहिल्या टप्प्यात या मार्गिकांवरून दर दिवशी सरासरी ३० हजार ५०० प्रवासी प्रवास करीत होते. मात्र दुसऱ्या टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतर या दोन्ही मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्या. त्यामुळे प्रवासीसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली. महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) दिलेल्या माहितीनुसार, जूनच्या शेवटच्या आठवड्यात या मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासीसंख्या दोन लाखांपार पोहोचली. या दोन्ही मार्गिकांवरून २७ जून रोजी एकूण दोन लाख ३ हजार ५८१ मुंबईकरांनी प्रवास केला होता.

mahakumbh 2025
Maha Kumbh 2025 : पवित्र कुंभस्नानासाठी ४८ लाख भाविकांचा ट्रेनने प्रवास, मौनी अमवास्येकरता रेल्वेकडून खास नियोजन!
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
train cancellations on western railway due to mega block
वाणगाव ते डहाणू रोडदरम्यान ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वेगाड्या रद्द
दोनदा मुदतवाढीनंतर मनीष नगर रेल्वे भुयारी मार्ग खुला होणार
Mumbai Western Railway Jumbo Block
जम्बो ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचे हाल; अंधेरी, बोरीवली स्थानकांवर प्रचंड गर्दी
maharashtra awaits additional railway trains for maha kumbh mela
तीर्थक्षेत्र दर्शनासाठी राज्याला अतिरिक्त रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा; कुंभमेळ्यामुळे गाड्यांची कमतरता
Railways still lagging behind in digital system railway administration accept fine amount in name of third party
रेल्वे डिजीटल प्रणालीत रेल्वे अद्याप मागे, दंडाची रक्कम त्रयस्थ व्यक्तीच्या नावे स्वीकारण्याची रेल्वे प्रशासनावर वेळ
Vasai Virar City, Vasai Virar City Rickshaw,
वसई विरार शहरात रिक्षा झाल्या उदंड, बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडी; प्रवासी नागरिक त्रस्त

हेही वाचा – मुंबई : कमी जागेत सरकत्या जिन्यांची उभारणी, प्रवाशांना फलाटावरून प्रवास करणे होणार सोयीस्कर

हेही वाचा – विकासकांना रेरा कायद्याचा धाक नाही? कारवाईनंतरही रेरा क्रमांकांशिवाय जाहिरात प्रसिद्ध करण्याचे प्रकार सुरूच

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील प्रवासीसंख्येने दोन लाखांचा टप्पा पार केल्यानंतर आता अवघ्या काही दिवसांतच प्रवासीसंख्या दोन लाखांवरून दोन लाख १४ हजारांवर पोहोचली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचल्याने वा इतर कारणांमुळे बुधवारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी अनेक प्रवाशांनी मेट्रोला पंसती दिली. मुसळधार पावसातही मेट्रो सेवा सुरळीत सुरू होती. त्यामुळे ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरून बुधवारी दोन लाख १४ हजार ७० प्रवाशांनी प्रवास केला, अशी माहिती एमएमएमओसीएलच्या अधिकाऱ्यांनी दिली. आतापर्यंतच्या दैनंदिन प्रवासी संख्येच्या तुलनेत बुधवारची प्रवासीसंख्या सर्वाधिक होती, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader