‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’च्या चाचणीस अखेर मंगळवार, ३० ऑगस्ट २०२२ पासून सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजता एका सोहळ्यात चाचणीला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमधील (एमएमआरसी) अधिकाऱ्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> एसी लोकलसंबंधी शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले “मागणीकडे लक्ष द्या, अन्यथा…”

‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’चे काम २०२१ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र विविध कारणांमुळे या प्रकल्पास विलंब झाला. आता ‘मेट्रो ३’चा सीप्झ ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय एमएमआरसीने घेतला आहे. रखडलेली सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली आहेत. ‘मेट्रो ३’ प्रकल्पातील कारशेडच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. तसेच श्रीसिटी येथून आणलेल्या पहिल्या मेट्रो गाडीची मुंबईत जोडणी करण्यात आली आहे. एमएमआरसीने मेट्रोच्या चाचणीची सर्व तयारी केली असून या चाचणीला मंगळवारपासून सुरुवात करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> बंडखोर बांगरांना टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, संतोष टार्फेंचा शिवसेनेत प्रवेश

सारीपूत नगर येथे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारशेडमध्ये मंगळवारी सकाळी ११ वाजता ‘मेट्रो ३’च्या चाचणीस सुरुवात करण्यात येईल, असे एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत चाचणीस सुरुवात करण्यात येणार आहे. सारीपूत नगर ते मरोळ अशी तीन किमीपर्यंत पहिली चाचणी होणार आहे. त्यानंतर चाचणी सुरूच राहील. एकूण १० हजार किमीपर्यंतची चाचणी यशस्वी झाल्यानंतर पुढे सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro 3 test will start from tomorrow chief minister and deputy chief minister will be present mumbai print news amy