मुंबईकरांसाठी बहुप्रतिक्षित अशा मेट्रोवन प्रकल्पाची सुरक्षा तपासणी पूर्ण झाली असून आता ती येत्या १५ मेपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांतर्फे या प्रकल्पाची सर्व तपासणी झाली आहे. आता आयुक्तांनी सुरक्षा प्रमाणपत्र दिल्यानंतर सात दिवसांत मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत धावेल, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले.
सुरक्षा प्रमाणपत्र ही केवळ औपचारिकता असल्याने १५ मेच्या आतच मेट्रो वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर प्रवाशांसह धावण्याची शक्यता आहे.
बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाने आतापर्यंत ११ वेळा डेडलाइन मोडली आहे. या प्रकल्पामुळे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर हा सध्या पाऊण ते एक तासात पूर्ण होणारा प्रवास अवघ्या २० मिनिटांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांना मेट्रोच्या पहिल्या टप्प्याबाबत खूपच उत्सुकता आहे.  
मेट्रोच्या एका फेरीतून एका वेळी ३७५ प्रवासी जाऊ शकतील. एका मेट्रोमध्ये चार डबे असून अशा १६ गाडय़ा सध्या एमएमआरडीएच्या ताफ्यात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा