मुंबई : दहिसरवरून घाटकोपर किंवा वर्सोवा आणि गोरेगाव, पोयसर किंवा बोरिवली पश्चिमपर्यंतचा प्रवास आता काही मिनिटांत करता येणार आहे. उपनगरातील मेट्रो रेल्वेच्या दोन मार्गिका शुक्रवारपासून सेवेत दाखल होत असल्याने मुंबईकरांचा प्रवास सुसह्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

मेट्रो २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम, डीएन नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते गुंदवली, अंधेरी पूर्व) या मार्गिकांवरून शुक्रवारपासून मेट्रो पूर्ण क्षमतेने धावणार आहे. एकमेकींशी जोडलेल्या या दोन्ही मार्गिका आता मेट्रो १ (घाटकोपर-वर्सोवा) मार्गिकेशीही जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणारी नवी जीवनवाहिनी म्हणून मेट्रोची ओळख निर्माण होणार आहे.

मुंबईत उपनगरीय रेल्वे आणि बेस्ट बसचे जाळे आहे. त्यामुळे एका मार्गावरून दुसऱ्या मार्गावरील इच्छित स्थळी जाणे शक्य आहे. पण, एका मेट्रोतून लगेचच दुसऱ्या मेट्रोद्वारे इच्छित स्थळी जाण्यासाठी मात्र आठ वर्षांहून अधिक काळ वाट पाहावी लागली.

‘मेट्रो १’ मार्गिका २०१४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली होती. त्यानंतर आता दोन मेट्रो मार्गिका पूर्ण क्षमतेने धावणार आहेत. या मार्गिका एकमेकींशी आणि ‘मेट्रो १’ला जोडण्यात आल्या आहेत.  ‘मेट्रो २ अ’ आणि ७ मार्गिका दहिसर पूर्व स्थानकाद्वारे एकमेकींशी जोडल्या आहेत. ‘मेट्रो २ अ’  अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानकाद्वारे ‘मेट्रो-१’ला जोडण्यात आली आहे. अंधेरी पश्चिम स्थानकावर उतरून मेट्रो १वरील डी. एन. नगर स्थानकावरून वर्सोवा किंवा घाटकोपरकडे जाता येईल. त्याच वेळी मेट्रो ७ मार्गिका आणि ‘मेट्रो १’ मार्गिका गुंदवली आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे मेट्रो स्थानकाद्वारे एकमेकींशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे घाटकोपरवरून दहिसरला गुंदवलीमार्गे जाता येईल. तर, दहिसरवरून घाटकोपरच्या दिशेने गुंदवलीमार्गे जाता येईल.

भविष्यात इतरही मेट्रो मार्गिका सेवेत दाखल होणार आहेत. त्याही एकमेकींशी जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे मेट्रो १, २ अ आणि ७ मार्गिकेच्या माध्यमातून निर्माण झालेले मेट्रोचे जाळे काही वर्षांत वाढत जाणार आहे.

मुंबईत उपनगरीय रेल्वे आणि बेस्ट बसचे जाळे आहे. त्यामुळे एका मार्गावरून दुसऱ्या मार्गावरील इच्छित स्थळी जाणे शक्य आहे. पण, एका मेट्रोतून लगेचच दुसऱ्या मेट्रोद्वारे इच्छित स्थळी जाण्यासाठी मात्र आठ वर्षांहून अधिक काळ वाट पाहावी लागली.

‘मेट्रो १’ मार्गिका २०१४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली होती. त्यानंतर आता दोन मेट्रो मार्गिका पूर्ण क्षमतेने धावणार आहेत. या मार्गिका एकमेकींशी आणि ‘मेट्रो १’ला जोडण्यात आल्या आहेत.

नवी जीवनवाहिनी

दहिसर ते अंधेरी पश्चिम, डीएन नगर आणि दहिसर पूर्व ते गुंदवली, अंधेरी पूर्व या मेट्रो रेल्वे मार्गिका शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने सेवेत दाखल होत आहेत. त्या एकमेकींशी जोडण्यात आल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सहजसाध्य करणारी ‘नवी जीवनवाहिनी’ अशी मेट्रोची ओळख निर्माण होणार आहे.

मुंबई उपनगरात मेट्रोचे जाळे निर्माण झाल्यामुळे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठी भर पडली आहे. मेट्रो १,मेट्रो २ अ आणि ७ मधून प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न साकार होत आहे.

एस.व्ही.आर. श्रीनिवासमहानगर आयुक्त

Story img Loader