पश्चिम रेल्वेवर अंधेरी आणि विलेपार्ले या स्थानकांदरम्यान मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातानंतर मुंबईतील वाहतूक व्यवस्था कोलमडली असली, तरी या आणीबाणीच्या प्रसंगी मेट्रोने मात्र मुंबईकरांना चांगलाच हात दिला. अंधेरी स्थानकात अडकलेल्या हजारो प्रवाशांना घाटकोपपर्यंत सुखरूप पोहोचवण्याचे काम मंगळवारी मेट्रोने केले. या अपघाताच्या दिवशी मेट्रोची प्रवासी संख्या २० हजारांनी वाढली. विशेष म्हणजे बेस्टप्रमाणे मेट्रोनेही या दिवशी वर्सोवा ते घाटकोपर यादरम्यान विशेष फेऱ्या चालवत गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला.
मंगळवारच्या ‘अपघात’वारात मेट्रो प्रवाशांत २० हजारांनी वाढ
आणीबाणीच्या प्रसंगी मेट्रोने मात्र मुंबईकरांना चांगलाच हात दिला.
Written by रोहित धामणस्कर
First published on: 17-09-2015 at 01:46 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro train passengers increased by 20 thousand on tuesday due to train accident at andheri