मुंबईप्रमाणेच नवी मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर या महानगरांमध्येही मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
त्यासंदर्भात स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल, असे त्यांनी सांगितले.
विधान परिषदेत मोहन जोशी व इतर सदस्यांनी पुणे शहरातील प्रस्तावित मेट्रो रेल्वे प्रकल्पाबाबतचा प्रश्न विचारला होता. त्यावर नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी पुणे शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी दोन टप्प्यांत मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. पहिला टप्पा ३१.५ किलोमीटराचा व दुसरा टप्पा ४४ किलोमीटरचा असून केंद्र व राज्य सरकारचे प्रत्येकी २० टक्के भागभांडवल, महानगरपालिकेचा १० टक्के निधी आणि ५० टक्के कर्जउभारणीतून हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.   मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर मुंबईप्रमाणेच नवी मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर या मोठय़ा महानगरांमध्ये मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा