पत्नीला ‘सेकंड हॅण्ड’ म्हटल्याने न्यायालयाने पतीला तीन कोटी रुपायांचा दंड ठोठावल्याची घटना मुंबईतून उघडकीस आली आहे. पत्नीने घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत पतीविरोधात तक्रार केली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला. ही घटना नेमकी कधीची आहे ते स्पष्ट झालेले नाही. पत्नीच्या म्हणण्यानुसार, तिचे दुसरे लग्न असल्याने तिचा पती तिला नेहमी ‘सेकंड हॅण्ड’ म्हणून हिणवत होता.
हेही वाचा – पातेल्यात अडकले चिमुकल्या बाळाचे डोके!अग्निशमन कर्मचाऱ्यांनी कसे वाचवले त्याचे प्राण, पाहा हा Video…
फर्स्ट पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील एका महिलेने तिच्या पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. पतीकडून आपला मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचे तिने या तक्रारीत म्हटले होते. तसेच आपले दुसरे लग्न असल्याने पती नेहमी ‘सेकंड हॅण्ड’ म्हणून हिणवतो, असेही तिने तक्रारीत नमूद केले होते. महिलेच्या तक्रारीनंतर मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने आरोपी पतीने त्याच्या पत्नीला तीन कोटी रुपयांची भरपाई द्यावी, असे आदेश दिले.
हेही वाचा – कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली विकले जातेय विष? व्हायरल VIDEO मध्ये पाहा बनावट कोल्ड्रिंक्सचा काळाबाजार
दरम्यान, क्षुल्लक कारणांवरून पत्नी-पत्नी यांच्यात वाद होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच आग्रा येथे मोमोजवरून पती-पत्नीदरम्याने भांडण झाले होते. त्यानंतर पत्नीने थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. खरे तर पत्नीने पतीकडे मोमोज खाण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि ती इच्छा पूर्ण न केली गेल्याने दोघांमध्ये वाद झाला होता.