मुंबई : मुंबई ही कर्मभूमी असणारे पण अखेरच्या काळात हिंदूत्ववाद्यांच्या तक्रारी व त्रास यांमुळे कतारवासी झालेले दिवंगत चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांनी अगदी ८० वर्षांपूर्वी उमेदवारीच्या काळात कपाट, खुर्च्या, टेबल, पलंग हे सारे फर्निचर कमळाच्या आकारात घडवले होते, ते जसेच्या तसे जतन करून ‘आर्ट मुंबई’ या मुंबईच्या पहिल्यावहिल्या व्यावसायिक कला-व्यापार मेळय़ात गुरुवारपासून प्रदर्शित होणार आहे. ‘आर्ट मुंबई’चे प्रवर्तक आणि ‘सॅफरॉनआर्ट.कॉम’चे संस्थापक दिनेश व मीनल वझीरानी या दाम्पत्याच्या संग्रहात हुसेन यांची ही कमळे असून, या कला-व्यापार मेळय़ात सहभागी होणाऱ्या ४५ हून अधिक आर्ट गॅलऱ्यांपैकी किमान सहा गॅलऱ्यांच्या ‘बूथ’मध्ये हुसेन यांच्या कलाकृतींचा समावेश आहे।

‘आर्ट मुंबई’चे पहिले दोन दिवस फक्त निमंत्रितांसाठीच राखीव असतील, तर शनिवार व रविवारी (१८ व १९ नोव्हें.) एका खेपेचे दीड हजार रुपये मोजणाऱ्या कलारसिकांना (विद्यार्थ्यांसाठी थोडय़ा सवलतीत) महालक्ष्मी रेसकोर्सच्या ‘मेम्बर्स आन्क्लाव’मध्ये भरलेला हा मेळा खुला राहील. त्या दोन दिवसांत मुंबईचे कलाक्षेत्र, दक्षिण आशियाई कला आदी विषयांवरील परिसंवादही उपस्थितांना ऐकता येतील. स्वित्झर्लंडच्या बाझल शहरातून या प्रकारच्या व्यावसायिक कला-व्यापार मेळय़ांची सुरुवात झाली आणि जगातील बहुतेक प्रमुख शहरांत असे मेळे होतात. पण मुंबईला मात्र अर्धव्यावसायिक किंवा हौशी स्वरूपाच्या कला-व्यापार मेळय़ांवर आजपर्यंत समाधान मानावे लागले, त्यामुळे ‘आर्ट मुंबई’ महत्त्वाचा ठरतो.

Swara bhaskar photo with Sajjad Nomani Troll
Swara Bhaskar: ‘व्होट जिहाद’चा उल्लेख केलेल्या सज्जाद नोमानींसह स्वरा भास्करचा फोटो पाहून नेटिझन्सनी उडवली खिल्ली
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Bipin preet singh Success Story
Success Story : आठ लाखांच्या बचतीतून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली करोडोंची कंपनी
aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा
Sandy Irvine 100 years later
Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला होता का? अर्विनचे सापडलेले अवशेष नेमकं काय सांगतात?
maharashtra assembly elections
२०१९ च्या त्या बैठकीत काय घडलं? कथित सत्तांतर घडवणारी बैठक कधी, केव्हा, कुठे झाली होती?
Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी

हेही वाचा >>> कारवाईचे फटाके; नियमभंगप्रकरणी मुंबई, ठाण्यात दीड हजार गुन्हे

यशस्वी दृश्यकलावंतांवर कला-व्यापाराची भिस्त असते, परंतु नव्या- नुकत्या स्थिरावू लागलेल्या तरुण कलावंतांनाही भविष्याच्या दृष्टीने आवर्जून स्थान दिले जाते. हाच प्रकार इथे दिसेल. गॅलऱ्या खरोखरच ज्या चित्रकारांचे प्रतिनिधित्व करतात, त्याच चित्रकारांच्या कलाकृती मांडाव्यात ही अपेक्षा लंडनच्या ग्रॉव्हेनॉ गॅलरीसह काही परदेशी गॅलऱ्यांनी, तसेच मुंबईच्या केमोल्ड प्रिस्कॉट रोड, गिल्ड, एक्स्पेरिमेंटर, चॅटर्जी अ‍ॅण्ड लाल, दिल्लीची गॅलरी स्के आदी गॅलऱ्यांनी पूर्ण केली आहे खरी. पण बहुतेकदा कला-व्यापार मेळय़ांमध्ये गॅलऱ्या ‘आहोत त्यापेक्षा मोठे’ दिसण्यासाठी ज्येष्ठ वा दिवंगत चित्रकारांच्या ज्या कलाकृती आपापल्या संग्रहात आहेत, त्याही इथे मांडतात. त्यामुळे अमृता शेरगिल, रेबा होरे, सुनयनी देवी, मीरा मुखर्जी या चौघींच्या कलाकृती मुंबईतील एका गॅलरीच्या बूथवर इथे दिसणार आहेत, भूपेन खक्कर, विवान सुंदरम, जोगेन चौधरी आदींच्या कलाकृती एकाहून अधिक बूथवर दिसतील. मात्र तुषार व मयूर वायेदा, राजश्री गुडी, सोहराब हुडा अशा व्यापारमूल्य ठरवणे कठीण असलेल्या तरुण दृश्यकलावंतांचाही समावेश यंदा ‘आर्ट मुंबई’त आहे, ही जमेची बाजू. हुसेन यांनी १९४१ ते ४३ या काळात एका फर्निचर कंपनीसाठी लहान मुलांचे फर्निचर डिझाइन करण्याचे काम केले, त्यापैकी कमळ ही मध्यवर्ती कल्पना असलेल्या फर्निचरचा अख्खा संच ‘आर्ट मुंबई’त असेल आणि हुसेन यांच्या त्या काळच्या अन्य डिझाइन्सचा समावेश असलेले ‘द फॅण्टसी कलेक्शन. हे सचित्र पुस्तकही इथेच प्रकाशित होईल.