महानगर गॅस कंपनीने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात केली आहे. सीएनजीच्या किमतीत किलोमागे ३ रुपयांनी कपात झाली आहे. तर घरगुती वापराच्या पीएनजीच्या दरात प्रति एससीएम २ रुपयांची कपात झाली आहे. ही कपात २ ऑक्टोबर सकाळपासून लागू होणार आहे. नैसर्गिक वायूच्या किंमतीत केंद्र सरकारने कपात केल्यामुळे महानगर गॅस कंपनीने आपल्याला ग्राहकांना देखील खुशखबर दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> सांताक्रुझ हत्येप्रकरणी आरोपीला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

नैसर्गिक वायूच्या किमतीत घसरण झाल्यामुळे त्याचा घरगुती आणि व्यावसायिक स्वरूपात वापर वाढण्यास मदत होणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. किंमतीमध्ये कपात केल्यामुळे आता सीएनजीचे दर प्रतिकिलो ७६ रुपये झाले आहेत तर घरगुती वापराचे पीएनजीचे दर ४७ रुपये एससीएम (स्टॅंडर्ड क्यूबिक मीटर) झाले आहेत. हे दर मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी लागू आहेत. आपले दर हे पेट्रोल, डिझेल व एलपीजी सिलिंडरच्या तुलनेत कमी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.