मुंबई : कायदेविषयक चाचणी परीक्षा असलेली सामाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षा २०२४ (सीयूईटी) आणि विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) एकाच दिवशी येत आहे. त्यामुळे सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. आतापर्यंत विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा तीन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : दोन मुले असल्याच्या कारणावरून महिला कर्मचाऱ्याला प्रसूती रजा नाकारणे अनुचित – उच्च न्यायालय

सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलतर्फे घेत येणाऱ्या विविध परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा २२ मे रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र कायदेविषयक चाचणी परीक्षेसाठी घेण्यात येत असलेली सामाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षा २०२४ (सीयूईटी) २२ मे रोजी होत आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होत आहेत. त्यामुळे सीईटी सेलने विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या वेळापत्रकानुसार विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमांची परीक्षा ३० मे २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. सामाईक प्रवेश परीक्षेचे प्रवेश पत्रक डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना ई-मेल आणि मोबाइलवर संदेशाद्वारे कळविण्यात येईल, असे सीईटी सेलकडून सांगण्यात आले.