मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठीच्या सोडतीच्या निकालाची तारीख अखेर म्हाडाने जाहीर केली आहे. येत्या ८ ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही सोडत काढण्यात येणार आहे.

मुंबई मंडळाने २०३० घरांसाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करून ९ ऑगस्टपासून अर्ज विक्री -स्वीकृतीस सुरुवात केली. सोडतीच्या मुळ वेळापत्रकानुसार ४ सप्टेंबर ही अनामत रकमेसह अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख होती. त्यानंतर पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून १३ सप्टेंबर रोजी सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार होता.

IPL 2025 Mega Auction Date, Time and Live Streaming in Marathi
IPL 2025 Mega Auction Schedule: आयपीएल २०२५ चा महालिलाव किती वाजता सुरू होणार? लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येईल? जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
preliminary round of loksatta lokankika one act play competition
 ‘लोकसत्ता लोकांकिका’ची पहिली घंटा; प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबरपासून; मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी
three days holiday to all schools
निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुटी? शिक्षण विभागाच्या सूचना काय?
Mumbai traffic routes marathi news
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल
Extension of the Sadanika Lottery Scheme of PMRDA Pune news
पीएमआरडीएच्या सदनिका लाॅटरी योजनेला मुदतवाढ
After Diwali municipalitys secondary division school timings changed again
माध्यमिक शाळांच्या वेळेत दिवाळी सुट्टीनंतर बदल, माध्यमिक शाळा पूर्वीप्रमाणेच सकाळी ८ ते २ या वेळेत

हे ही वाचा…मुंबई : आत्महत्येचे प्रमाण अधिक म्हणून मराठा समाजाला मागास म्हणू शकत नाही

अर्ज विक्री – स्वीकृतीस एक आठवडा शिल्लक होता, त्याच वेळी मंडळाने अर्जविक्री-स्वीकृतीस मुदतवाढ दिली. त्यामुळे १३ सप्टेंबरची सोडत पुढे गेली. मुदतवाढीनुसार १९ सप्टेंबर ही अर्ज विक्री-स्वीकृतीची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली. मात्र पात्र अर्जदारांची प्रारूप यादी, अंतिम यादी आणि सोडतीचा निकाल कधी जाहीर होणार हेही जाहीर करण्यात आले नव्हते.

दरम्यान, मंडळाने म्हाडाच्या संकेतस्थळावर गुरुवारी रात्री उशिरा वेळापत्रक प्रसिद्ध केले. या वेळापत्रकानुसार ८ ऑक्टोबर रोजी सोडत जाहीर होणार आहे. तर संगणकीय पद्धतीने अर्ज भरण्याची मुदत १९ सप्टेंबर रोजी दुपारी ११ वाजून ५९ मिनिटे अशी असणार आहे.

हे ही वाचा…गोराई, चारकोप, मालवणीतील जागतिक बँक प्रकल्पातील रहिवाशांना दिलासा

३ ऑक्टोबरला पात्र अर्जदारांची अंतिम यादी

अर्ज विक्री-स्वीकृतीची प्रक्रिया संपल्यानंतर अर्जांची छाननी करून २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पात्र अर्जांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. पात्र अर्जदारांची अंतिम यादी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात सोडतीचा निकाल जाहीर होणार आहे.