Old Pension Scheme Employee Scheme : सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने मंगळवारपासून पुकारलेल्या संपाला म्हाडा कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. म्हाडा कर्मचारी संपात सक्रिय सहभागी झालेले नसले तरीही त्यांनी आंदोलनकर्त्यांना पाठींबा दिला आहे. संपाला पाठींबा दर्शविण्यासाठी म्हाडातील सर्व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काळ्या फिती बांधून काम केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जुन्या निवृत्ती वेतनासाठी राज्यातील अंदाजे १८ लाख सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. म्हाडा कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन योजना लागू नाही. निवृत्ती वेतन लागू व्हावे यासाठी म्हाडा कर्मचाऱ्यांचा लढा सुरू आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) स्वतःचा निधी उभारून कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे. याच धर्तीवर म्हाडातील कर्मचाऱ्यांसाठीही निवृत्ती वेतन योजना लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र गृहनिर्माण कर्मचारी संघटना, म्हाडा मागासवर्गीय कर्मचारी संघटना आणि ग्रॅज्युएट इंजिनिअर्स असोसिएशन, म्हाडा या संघटनांकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा – मुंबई : रुग्णालयांतील बाह्यरुग्णसेवा सुरळीत, मात्र आंतर रुग्णसेवेवर परिणाम

हेही वाचा – मुंबई : प्रवाशांकडून लाच घेणारा रेल्वे पोलीस निलंबित

सरकारी कर्मचारी आपल्या जुन्या निवृत्ती वेतनासाठी लढा देत असताना त्यांना पाठिंबा देणे आवश्यक आहे. त्यामुळे म्हाडा कर्मचाऱ्यांनी या संपाला पाठींबा दिला आहे. मात्र निवृत्ती वेतन योजना लागू नसल्याने ते कुठेही संपात सक्रिय सहभागी नाहीत. केवळ पाठींबा दर्शविण्यासाठी त्यांनी मंगळवारी काळ्या फिती बांधून काम केले.