हक्काचे घर मिळण्याचे गिरणी कामगारांचे स्वप्न आता साकार होत असून प्रजासत्ताक दिनी १० कामगारांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते घराची किल्ली देण्यात येणार आहे.
‘म्हाडा’ने जून २०१२ मध्ये गिरणी कामगारांसाठी ६९२५ घरांची सोडत काढली होती. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता सोडतीमधील यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी सुरू होऊन पात्रता यादी तयार होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत १५५९ अर्जदारांची पात्रता यादी जाहीर झाली आहे. या घरांची किंमत साडे सात लाख रुपये असून त्यासाठी मुंबै बँकेतर्फे साडे सहा लाखांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.
आतापर्यंत सात-आठ पात्र अर्जदारांनी घरांची पूर्ण रक्कम ‘म्हाडा’कडे जमा केली आहे. ती संख्या वाढत असून प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते प्रातिनिधीक गिरणी कामगारांना घराची किल्ली देण्यात येईल. सह्याद्री अतिथीगृहावर शनिवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल.
हक्काच्या घराची किल्ली उद्या गिरणी कामगारांना मिळणार
हक्काचे घर मिळण्याचे गिरणी कामगारांचे स्वप्न आता साकार होत असून प्रजासत्ताक दिनी १० कामगारांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते घराची किल्ली देण्यात येणार आहे.‘म्हाडा’ने जून २०१२ मध्ये गिरणी कामगारांसाठी ६९२५ घरांची सोडत काढली होती.
First published on: 25-01-2013 at 03:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada house for worker key will distribute tomorrow