मंगल हनवते

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाची घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याच्या तक्रारी असतानाच सोडतीतील महागडी घरे आमदारांनाही परवडत नसल्याचे चित्र आहे. ताडदेवमधील साडेसात कोटींच्या दोन घरांसाठी बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे हे विजेते ठरले खरे, पण परवडत नसल्याने त्यांनी दोन्ही घरे परत केली. आता प्रतीक्षा यादीवरील विजेते केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांना घराची संधी आहे.

Kalyan Viral Video
“कल्याणकरांचं आयुष्य सोपं नाहीय”, कल्याण स्टेशनवरचा ‘तो’ जीवघेणा प्रकार पाहून धक्का बसेल; VIDEO एकदा पाहाच!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Rane family on Sindhudurg DPDC
सिंधुदुर्ग डीपीडीसी पूर्णपणे राणे कुटुंबीयांच्या ताब्यात; इतर कोणत्या जिल्ह्यात एकाच कुटुंबाचा वरचष्मा?
upper tehsil office at ashvi in sangamner taluka
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय
Devendra Fadnavis assurance in investigation in Chandrapur district cooperative bank recruitment
चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरतीची चौकशी, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; पोतराजेंच्या उपोषणाची सांगता
Development works worth one thousand crores will be done in Nagpur says chandrashekhar bawankule
उपराजधानीत एक हजार कोटींची विकासकामे होणार; कारागृह, बसस्थानकांसह…
maharashtra awaits additional railway trains for maha kumbh mela
तीर्थक्षेत्र दर्शनासाठी राज्याला अतिरिक्त रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा; कुंभमेळ्यामुळे गाड्यांची कमतरता
Local Government Election Preparations BJP busy in front building but Congress is sluggish
भाजप मोर्चेबांधणीत व्यस्त, काँग्रेस सुस्तच! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पूर्वतयारी

  मुंबई मंडळाने १४ ऑगस्टला ४०८२ घरांसाठी सोडत काढली. त्यात काही लोकप्रतिनिधींनी आरक्षित प्रवर्गातून अर्ज केले होते. यात भागवत कराड, कुचे यांच्यासह अन्य आजी-माजी लोकप्रतिनिधींचा सहभाग होता. कुचे आणि कराड यांनी ताडदेवमधील क्रिसेन्ट टॉवरमधील साडेसात कोटींच्या घरासाठी अर्ज केला होता. लोकप्रतिनिधी प्रवर्गात एक घर होते आणि त्यासाठी दोन अर्ज होते. सोडतीत कुचे हे या घरासाठी विजेते ठरले. कराड प्रतीक्षा यादीवरील विजेते ठरले. त्याचवेळी ताडदेवमधीलच साडेसात कोटींच्या अनुसूचित जाती प्रवर्गातील घरासाठीही कुचे हे विजेते ठरले होते. सोडतीनंतर मंडळाने विजेत्यांना ऑनलाइन स्वीकृती पत्र पाठवले असून, घर घेणार की परत करणार, हे त्या पत्राद्वारे २७ ऑगस्टपर्यंत विजेत्यांनी मंडळाला कळवणे आवश्यक आहे. या प्रक्रियेनुसार आपण ताडदेवमधील दोन्ही घरे गुरुवारी परत केल्याची माहिती कुचे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. म्हाडाची घरे महाग असून ती सर्वसामान्यांना परवडत नसल्याचे सांगून त्यांनी किमतीबाबत नाराजी व्यक्त केली.

 कुचे यांनी दोन्ही घरे परत केल्याने आता प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी दिली जाणार आहे. त्यात लोकप्रतिनिधी प्रवर्गात केंद्रीय मंत्री कराड यांचा समावेश आहे. त्यामुळे आता कराड हे घर घेणार का, केंद्रीय मंत्री म्हाडाचे लाभार्थी ठरणार का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. याबाबत कराड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. कराड यांनीही हे घर नाकारल्यास या घरासाठी सर्वसाधारण वर्गातील प्रतीक्षा यादीवरील विजेत्याला संधी दिली जाईल. त्यांनीही घर नाकारल्यास घर विक्रीअभावी पडून राहील आणि पुढील सोडतीत ते समाविष्ट केले जाईल.

गृहकर्ज मिळवण्याचे आव्हान

 म्हाडाची सोडतीसाठीची उत्पन्न मर्यादा आणि घरांच्या किमती यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे विजेत्यांना घरे परवडत नसून, गृहकर्ज मिळणे अवघड बनले आहे. त्यातही ‘पीएमएवाय’ योजनेतील अनेक विजेत्यांची चिंता वाढली आहे. तीन लाखांच्या आत उत्पन्न मर्यादा असताना घराची किंमत ३० लाख ४४ हजार रुपये आहे. म्हणजे महिना २५ हजारांच्या आत उत्पन्न असलेले अर्जदार विजेते ठरले असून, त्यांना गृहकर्ज मिळत नसल्याचे दिसत आहे. अवघे १५-१६ लाख रुपये कर्ज मिळू शकत असल्याने घर घ्यायचे कसे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सोडतीत विजेता ठरल्यानंतर गृहकर्ज आणि रकमेची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला. पण, मी इतकी मोठी रक्कम जमवू शकत नाही, आपल्याला तितके गृहकर्ज मिळणार नाही, याची खात्री झाली. त्यामुळे दोन्ही घरे परत केली. –नारायण कुचे, आमदार

Story img Loader