लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४,६५४ (१४ भूखंडांसह) घरांच्या सोडतीसाठी रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४२ हजार १५ इच्छुकांनी अर्ज भरले असून यापैकी २७ हजार ९८२ जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. आता अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवसांची मुदत शिल्लक असून अनामत रक्कमेसह अर्ज दाखल करण्याची मुदत २१ एप्रिल रोजी संपणार आहे.

कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीला यंदा खूपच कमी प्रतिसाद मिळाला आहे. नवीन सोडत प्रक्रियेसह ही सोडत काढण्यात येणार आहे. या नव्या प्रक्रियेनुसार आता आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोडतीआधीच सादर करणे आवश्यक आहे. मात्र या अटीची अनेकांना पूर्तता करता आलेली नाही. कागदपत्र वेळेत उपलब्ध होत नसल्याने अनेकांना अर्ज करणे शक्य झालेले नाही. परिणामी, यंदा कोकण मंडळाच्या सोडतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.

आणखी वाचा-राज्यात ‘माहिती अधिकारा’चा फज्जा; मुख्य आयुक्तांसह माहिती आयुक्तांची चार पदे रिक्त

यापूर्वी घरांच्या सोडतीसाठी दोन ते अडीच लाख अर्ज सादर होत होते. मात्र या सोडतीसाठी रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत २७ हजार ९८२ अर्ज सादर झाले आहेत. आता अर्ज करण्यासाठी केवळ दोन दिवस, तर अर्ज जमा करण्यासाठी केवळ चार दिवस शिल्लक आहेत. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावे, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.