मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने २०२३ मध्ये सलग दुसरी सोडत काढली असून या सोडतीला सर्वात कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. अर्जविक्री-स्वीकृतीला सुरुवात होऊन २० दिवस झाल्यानंतर आणि अर्जस्वीकृतीला केवळ १० दिवस शिल्लक असतानाही अनामत रक्कमेसह दाखल झालेल्या अर्जांनी पाच हजारांचाही पल्ला पार केलेला नाही. शुक्रवारी (६ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजेपर्यंत अनामत रक्कमेसह केवळ ३ हजार ८४० अर्ज सादर झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोकण मंडळाने ४६५४ घरांसाठी मे महिन्यात सोडत काढली. या सोडतीसाठी अनामत रक्कमेसह ४९ हजार १७४ अर्ज सादर झाले होते. सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला. पण प्रत्यक्षात योजनेनुसार २० टक्के योजनेतील घरे वगळता इतर घरांसाठी अर्जच न आल्याने ४६५४ पैकी २००० हून अधिक घरे विकलीच गेली नाहीत. पुढे विजेत्यांनीही मोठ्या संख्येने घरे नाकारली. त्यामुळे २००० हून कमी घरांची विक्री मे २०२३ च्या सोडतीत झाली. या सोडतीत घरे विकली न गेल्याने कोकण मंडळाने शिल्लक घरांसह २० टक्के योजनेतील उपलब्ध अन्य घरांचा समावेश करून ५३११ घरांसाठी १५ सप्टेंबरपासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली.

हेही वाचा – “…म्हणून गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागली”, दिल्लीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण

अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू होऊन आता २० दिवस झाले असून अर्जविक्री-स्वीकृतीसाठी केवळ १० दिवस शिल्लक आहेत. असे असताना आतापर्यंत ५३११ घरांसाठी केवळ ८ हजार २९३ इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. त्यातील केवळ ३ हजार ८४० अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज दाखल केले आहेत. हा प्रतिसाद अत्यंत कमी असून कोकण मंडळाची चिंता वाढविणारा आहे. पुढील दहा दिवसांत अनामत रक्कमेसह १० हजार तरी अर्ज येतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोकण मंडळाच्या सोडतीला मिळणार हा आतापर्यंतचा सर्वात कमी प्रतिसाद आहे. त्यामुळे कोकणातील घरांना इच्छुकांची पसंती का मिळत नाही याचा विचार करण्याची वेळ कोकण मंडळावर आली आहे.

हेही वाचा – बारामती ॲग्रो औद्योगिक प्रकल्प बंद करण्याचे प्रकरण : रोहित पवार यांना मिळालेला अंतरिम दिलासा १३ ऑक्टबरपर्यंत कायम

दरम्यान सोडतीला प्रतिसाद मिळत नसल्याने अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ देण्याची चर्चा म्हाडात आहे. पण कोकण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप असा कोणताही विचार नसल्याचे सांगितले. त्याचवेळी विरार-बोळींजच्या घरांना पाण्याच्या समस्येमुळे प्रतिसाद मिळत नसून २० टक्के योजनेतील घरे निर्माणाधीन असल्याने इच्छुक पुढे येत नसल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.