मुंबई: सर्वसमावेशक गृहयोजनेत म्हाडाला दिलेल्या २० टक्क्यांतील घरांच्या किमतीत सोडतीअंती भरमसाट वाढ करण्याचा विकासकांचा पायंडा आता मोडीत निघणार आहे. सोडतीनंतर घरांच्या किमतीत मनमानीपणे करण्यात येणाऱ्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी म्हाडा प्राधिकरणाने नुकताच एक प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे.

या योजनेतील घरांसाठी म्हाडाने निश्चित केलेल्या किमतींवर केवळ पाच लाखांपर्यंतच अतिरिक्त रक्कम घेता येणार आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.खासगी विकासकांच्या प्रकल्पातील घरे अत्यल्प आणि अल्प गटाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावीत, परवडणाऱ्या घरांची संख्या वाढावी यासाठी राज्य सरकारने २०१३ मध्ये २० टक्के सर्वसमावेशक योजना लागू केली. मुंबई वगळता १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व महापालिका क्षेत्रांत ही योजना लागू आहे.

Redevelopment , Developers Committee, Old Thane ,
जुन्या ठाण्यातील पुनर्विकासासाठी विकासकांची समिती
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
overseas debt become expensive due to the depreciating rupee
रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग
Wildlife scientists and animal researchers claim about the golden fox thane news
मानवी वस्तीत येणारे सोनेरी कोल्हे निवासीच! वन्यजीव शास्त्रज्ञ, प्राणी अभ्यासकांचा दावा
dragon farming in konkan maharashtra dragon fruit farming
लोकशिवार : कोकणात ड्रॅगनची शेती
MahaRERA action against 905 housing projects Mumbai news
१,९०५ गृहप्रकल्पांवर ‘महारेरा’ची कारवाई; नोटिशीला प्रतिसाद न देणाऱ्या विकासकांची बॅँक खाती गोठवली
LA Wildfires reason
१६ हजार एकरवर अग्नितांडव; कलाकारांसह अनेकांची घरे भस्मसात, अमेरिकेतल्या भीषण आगीचे कारण काय?
Efforts underway to reduce human-wildlife conflict says Vivek Khandekar
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू – खांडेकर

हेही वाचा >>>Yamini Jadhav Burka Distribution: शिवसेना शिंदे गटाच्या बुरखावाटपामुळे महायुतीत वादाची ठिणगी? आशिष शेलारांनी केली टीका

विकासकांकडून गैरफायदा

नियमानुसार म्हाडाच्या सोडतीच्या किमतीवर वाहनतळ, जलतरण तलाव आणि इतर काही शुल्क घेण्याची मुभा विकासकाला आहे. मात्र त्याचा गैरफायदा घेत खासगी विकासक घरांच्या किमतीत भरमसाट वाढ करीत असल्याने ही घरे विजेत्यांना परवत नाहीत. त्यामुळे विजेत्यांवर आर्थिक भार पडत आहे किंवा विजेत्यांना घर परत करावे लागत आहे.

Story img Loader