MHADA Mumbai Lottery 2024 Update: मायानगरी मुंबईत स्वत:चे हक्काचे घर असावे असे प्रत्येक मुंबईकराचे स्वप्न असते. मात्र, मुंबईत जमिनीला सोन्याचा भाव असल्यामुळे प्रत्येकालाच हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. मात्र, आता तुमचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार आहे. म्हाडा मुंबई मंडळाकडून लॉटरीची जाहिरात काढण्यात आलीय. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीचा कार्यक्रम म्हाडाने बुधवारी अधिकृतपणे जाहीर केला. शुक्रवारपासून म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज भरता येणार. त्यानंतर १३ सप्टेंबरला म्हाडाच्या लॉटरीचा निकाल जाहीर केला जाईल. यावेळी https://housing.mhada.gov.in, https://mhada.gov.in , Mobile App- MHADA Housing Lottery System या ठिकाणी म्हाडा लॉटरीबाबत सविस्तर माहिती पाहता येईल. त्याआधी कोणत्या गटासाठी किती घरं? म्हाडाची घरे मुंबईतील कोणत्या भागात? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, म्हाडाच्या घराच्या किमती कशा असू शकतात, याबद्दल जाणून घेऊयात.
कोणत्या गटासाठी किती घरं? (MHADA Lottery 2024: Eligibility Criteria)
म्हाडाकडून ज्या २०३० घरांसाठी ही लॉटरी काढण्यात येणार आहे, त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३५९, अल्प उत्पन्न गटासाठी ६२७, मध्यम उत्पन्न गटासाठी ७६८ आणि उच्च उत्पन्न गटासाठी २७६ घरं उपलब्ध आहेत.
म्हाडाची घरे मुंबईतील कोणत्या भागात? (MHADA Lottery 2024: Locations of flats in Mumbai)
मुंबई उपनगरातील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवारनगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड या ठिकाणी म्हाडाची घरे आहेत. म्हाडाच्या लॉटरीसाठी नेहमीप्रमाणे अत्यल्प (६ लाख), अल्प (९ लाख), मध्यम (१२ लाख), उच्च उत्पन्न गट म्हणजे १२ लाखांपेक्षा अधिक असे उत्पन्ननिहाय गट करण्यात आले आहेत.
म्हाडाच्या घराच्या किमती कशा असू शकतात? (MHADA Lottery 2024: Flats Price)
म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या मते, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) गटातील घरांची किंमत साधारणपणे ३० लाखांपासून सुरू होते आणि उच्च उत्पन्न (HIG) गटातील ३ BHK अपार्टमेंट्सची किंमत एक कोटींच्या वर जाऊ शकते. उच्च उत्पन्न श्रेणीतील ३ BHK अपार्टमेंटसाठी सर्वाधिक किंमत असेल. म्हाडाची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर किमतीची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.
म्हाडाच्या घरांसाठी कधी करता येणार ऑनलाइन अर्ज?
म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला ९ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२ वाजेपासून सुरुवात होईल. नोंदणीकृत अर्जदार https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.
म्हाडाचा अर्ज कसा भराल? डिपॉझिट ते महत्त्वाचे कागदपत्र, A to Z Updates
म्हाडाच्या अर्जाची किंमत किती? (MHADA Lottery 2024: application Fee?)
अर्ज शुल्क ५००/- + जीएसटी @ १८% – ९०/ = एकूण ५९०/- अर्ज शुल्क विना परतावा
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख कोणती? (MHADA Lottery 2024: Last date)
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत ४ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑनलाइन अनामत रक्कम स्वीकारण्याची तारीख ४ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत असणार आहे.
म्हाडा गृहनिर्माण योजना २०२४ : आवश्यक कागदपत्रे (Mhada Lottery 2024 Documents Required)
१. पॅन कार्ड
२. आधार कार्ड
३. अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
४. रद्द केलेला चेक
५. चालक परवाना
६. पासपोर्ट आकाराची छायाचित्रे
७. जन्म प्रमाणपत्र
८. अर्जदारांचे संपर्क तपशील.
हेही वाचा >> आचारसंहितेआधी म्हाडा सोडत अडचणीची, अर्ज भरण्यासाठी केवळ २६ दिवसांचा कालावधी
अर्ज कसा भरायचा? (How to apply for MHADA Lottery 2024)
म्हाडा लॉटरी २०२४ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. गृहखरेदीदार म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट housing.mhada.gov.in वर लॉटरीसंबंधित सर्व माहिती पाहू शकतात.
१. म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट housing.mhada.gov.in वर जा.
२. अर्जदाराचं नाव, पासवर्ड तयार करून स्वतःची नोंदणी करा.
३. उपलब्ध पर्यायांमधून इच्छित लॉटरी आणि योजना निवडा.
४. आवश्यक लॉटरी नोंदणी शुल्क ऑनलाइन भरा.
५. खरेदीदाराने हे लक्षात घ्यावे की, फीची रक्कम तुमच्या उत्पन्नाच्या श्रेणीवर आधारित आहे.
६. अर्जदारांना नोंदणी करण्यासाठी म्हाडाने एक मोबाइल ॲप्लिकेशनही विकसित केले आहे.