पूर्वी सोडतीत अयशस्वी ठरलेल्यांनाही सहभागी होता येणार

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने ४,०८२ घरांच्या सोडतीसाठी ऑनलाईन नोंदणी, अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रियेतील अडचणी सोडविण्यासाठी वेब संवादाचे आयोजन केले आहे. त्यानुसार शनिवार, १७ जून रोजी सकाळी ११ वाजता वेब संवाद होणार असून नोंदणीधारक, अर्जदार आणि यापूर्वी म्हाडाच्या घरासाठी अर्ज केलेल्या सर्वांना एक लिंक पाठविण्यात आली आहे. या सर्वांनी मोठ्या संख्येने या वेब संवादात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई मंडळ पहिल्यांदाच नवे बदल आणि नव्या संगणकीय प्रणालीसह घरांसाठी सोडत काढत आहे. १८ जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या ४,०८२ घरांच्या सोडतीसाठी २२ मेपासून नोंदणी, अर्ज विक्री – स्वीकृती सुरू झाली आहे. या प्रक्रियेला आता तीन आठवडे होत आले तरी अर्ज विक्री – स्वीकृतीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे मंडळाची चिंता काहीशी वाढली आहे. अर्जसंख्या वाढविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता वेब संवादाचे आयोजन करण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता, या सोडतीतील युझर्स, नोंदणीधारक आणि अर्जदार यांच्यासह यापूर्वीच्या सोडतीतील अर्थात जुन्या अयशस्वी अर्जदारांना यात सहभागी करून घेण्यात येणार असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. अर्ज भरण्यासाठी जुन्या नोंदणीधारकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच नवीन नोंदणीधारक आणि अर्जदारांना अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न या वेब संवादाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी lottery-webinar.mhada.gov.in ही लिंक जुन्या – नवीन नोंदणीधारकांना आणि अर्जदारांना एसएमएसद्वारे पाठविण्यात येणार आहे. या लिंकद्वारे इच्छुकांना शनिवारी सकाळी ११ वाजता वेब संवादात सहभागी होता येणार आहे.

During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
Extension of the Sadanika Lottery Scheme of PMRDA Pune news
पीएमआरडीएच्या सदनिका लाॅटरी योजनेला मुदतवाढ
Nashik Voting, satellite phone, polling stations in Nashik district , Nashik latest news,
मतदानाच्या माहितीसाठी १० उपग्रहाधारित फोन, ८८ धावपटूंचा वापर, नाशिक जिल्ह्यात १०३ मतदान केंद्र संपर्कहिन
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?
house lottery application, deadline, Navi Mumbai,
घरे सोडत अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढीची मागणी, आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी दिलेली मुदत अपुरी असल्याचे अनेकांचे मत
dispute in Urans Mahavikas Aghadi in assembly election 2024
उरणमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी

हेही वाचा >>>मुंबई लोकलमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा विकृतच; त्याच दिवशी आणखी पाच महिलांशीही केलं गैरवर्तन!

म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळावरही वेब संवादाची लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत वेब संवाद होणार आहे.