लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया नुकतीच संपुष्टात आली असून मुंबई मंडळाने अर्ज विक्री – स्वीकृतीसाठी दिलेल्या विहित मुदतीत अनामत रकमेसह एक लाख १३ हजार इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. प्राप्त अर्जांची मुंबई मंडळाकडून छाननी पूर्ण करण्यात आली असून गुरुवार, २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पात्र अर्जदारांची प्रारूप यादी मुंबई मंडळ म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करणार आहे.

80 people died in police custody in the state
राज्यात ८० जणांचा पोलीस कोठडीत मृत्यू, गेल्या पाच वर्षांत देशभरात ६८७ जण दगावले
Sharmila Raj Thackeray on Akshay Shinde Encounter
Akshay Shinde Encounter: “असे एन्काऊंटर झाले पाहीजेत…”, अक्षय…
Relief to Mohit Kamboj in fraud case loss of Rs 103 crore case closed
फसवणुकीप्रकरणी मोहित कंबोज यांना दिलासा, १०३ कोटी रुपयांचे नुकसान केल्याचे प्रकरण बंद
Badlapur-Navi Mumbai travel will be in 20 minutes MMRDA to build Airport Access Control Road
बदलापूर-नवी मुंबई प्रवास २० मिनिटांत! ‘एमएमआरडीए’ बांधणार विमानतळ प्रवेश नियंत्रण मार्ग
death case of pregnant women and newborn child in bhandup Court orders JJ Hospital authorities to explain
गर्भवती, नवजात बालकाच्या मृत्युचे प्रकरण : जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठत्यांना उपस्थित राहून स्पष्टीकरण देण्याचे न्यायालयाचे आदेश
Famous writer and director Madhura Jasraj passed away
प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका मधुरा जसराज यांचे निधन
Residents on the master list will have to pay a lower rate for more area MHADA Vice Presidents decision
‘मास्टर लिस्ट’वरील रहिवाशांना ज्यादा क्षेत्रफळासाठी कमी दर मोजावा लागणार! म्हाडा उपाध्यक्षांचा निर्णय
Mumbai Metro 3 Phase 1
Mumbai Metro 3 : मेट्रो ३ चा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार, तारीख व तिकीट दरही ठरले! बीकेसी-आरे प्रवास अवघ्या ३० मिनिटात
Reconstruction of Nariman Point Marina Project to promote water tourism
‘नरिमन पॉइंट’ची फेररचना; जल पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘मरिना प्रकल्प’

मुंबईतील गोरेगाव, बोरिवली, जुहू, पवई, विक्रोळी, ताडदेव, दादर, वरळी, वडाळा आदी ठिकाणच्या २०३० घरांसाठी ९ ऑगस्टपासून सोडत पूर्व प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ९ ऑगस्ट ते १९ सप्टेंबरदरम्यान ही प्रक्रिया सुरू होती. या कालावधीत मुंबई मंडळाकडे अनामत रकमेसह एक लाख १३ हजार अर्ज सादर झाले आहेत. या अर्जांची छाननी करण्यात आली असून छाननीत पात्र – अपात्र ठरणाऱ्या अर्जदारांची यादी गुरुवारी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अपात्र ठरलेल्या अर्जदारांना सूचना – हरकती नोंदविण्यासाठी काही कालावधी देण्यात येणार आहे. या कालावधीत आपल्या अर्जातील त्रुटी दूर करणाऱ्या आणि आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांची नव्याने पात्रता तपासत एकूण पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

आणखी वाचा-राज्यात ८० जणांचा पोलीस कोठडीत मृत्यू, गेल्या पाच वर्षांत देशभरात ६८७ जण दगावले

सोडतीच्या वेळापत्रकानुसार अंतिमतः पात्र ठरलेल्या अर्जदारांची यादी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीत जे अर्जदार समाविष्ट असतील तेच सोडतीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे या यादीत एकूण किती अर्जदार पात्र ठरतात आणि किती अर्जदार सोडतील सहभागी होतात हे ३ ऑक्टोबर रोजी स्पष्ट होईल. पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढली जाणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे उपस्थित राहणार आहेत. सोडतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी अर्जदारांची यादी ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर यशस्वी अर्जदारांना देकार पत्र वितरित करून त्यांच्याकडून घराची विक्री किंमत भरून घेतली जाईल. निश्चित कालावधीत जे यशस्वी अर्जदार घराची संपूर्ण रक्कम मुद्रांक, शुल्क नोंदणी शुल्क आणि देखभाल शुल्क अदा करतील त्यांना घरांचा ताबा दिला जाईल. दरम्यान, यंदा सोडतील निर्माणाधीन प्रकल्पातील घरांची संख्या बरीच आहे. त्यामुळे अशा घरांसाठी यशस्वी ठरलेल्या अर्जदारांना घराचे काम पूर्ण होऊन निवासी दाखला मिळाल्यानंतर घरांचा ताबा दिला जाणार आहे.