वाढत्या महागाईचा आणखी फटका मुंबईकरांना बसणार असून ‘म्हाडा’च्या घरांच्या किमती वाढण्याचे संकेत मिळाले आहेत. केंद्र सरकारच्या प्रचलित धोरणानुसार सेवा कर, विक्री कर, व्हॅट यांच्यात वाढ करण्याचे सुचविण्यात आले आहे. आगामी काळात या करांमध्ये पाच ते दहा टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असून त्याच तुलनेत घरांच्या किमतीही वाढणार आहेत. त्यामुळे मुंबईत घर घेण्याच्या सर्वसामान्यांच्या स्वप्नाला आता घरघर लागणार आहे.
या संदर्भात तूर्तास कोणताही निर्णय घेण्यात आला नसला तरी केंद्र शासनाकडून आलेल्या सूचनेनुसार सेवा कर, विक्री कर, व्हॅट या करांसोबत अन्य करांमध्येही वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ‘म्हाडा’च्या घरांच्या किमती तब्बल दहा टक्क्यांनी वाढू शकतात.
राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी याला दुजोरा दिला. मात्र, याविषयीचे धोरण अद्याप निश्चित झाले नसल्याचे ते म्हणाले. ही करवाढ कमी करण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारशी चर्चा करणार असून, त्याबाबत निर्णय घेण्यासाठी सोमवारी (१५ ऑक्टोबर) सर्व संबंधितांची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा