मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील विविध वापरासाठी राखीव १७ भूखंडाच्या ई लिलावासाठीच्या निविदा प्रक्रियेस अखेर मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार ७ मे पर्यंत निविदा सादर करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. त्यानंतर निविदा खुल्या करून पुढील प्रक्रिया झाल्यानंतर जूनमध्ये १७ भूखंडांचा ई लिलाव जाहीर केला जाणार आहे. मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील काही भूखंड अनेक वर्षे विक्रीवाचून पडून आहेत. सध्या मुंबई मंडळाकडून अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले असून त्यासाठी मंडळाला निधीची गरज आहे. त्यामुळे पडून असलेले १७ भूखंड शोधून काढत मंडळाने या भूखंडांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार मार्चमध्ये १७ भूखंडांच्या विक्रीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मालवणी, कांदिवली, टागोरनगर (विक्रोळी), कन्नमवारनगर (विक्रोळी), प्रतीक्षानगर आणि जोगेश्वरी येथील भूखंडांचा ई लिलावात समावेश करण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, मनोरंजन मैदाने अशा विविध वापरासाठी हे भूखंड आरक्षित आहेत. विविध क्षेत्रफळाच्या या भूखंडांसाठी मुंबई मंडळाने ४५ हजार ३०० रुपये प्रति चौरस मीटरपासून १ लाख ६ हजार १७० रुपये प्रति चौरस मीटर दराने बोली निश्चित केली आहे. त्यापेक्षा सर्वाधिक बोली लावणारी निविदाकार संस्था, व्यक्तींना हे भूखंड वितरीत केले जातील. ई – लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुकांना बोली रक्कमेच्या एक टक्के अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

zilla parishad loksatta
राज्यातील सहा जिल्हा परिषद, ४४ पंचायत समितींवर ‘प्रशासक राज’; मुदतवाढ नाहीच
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
bmc fixed deposits reduce by 10 thousand crore in current financial year
मुदतठेवींमध्ये १० हजार कोटींची घट; पालिकेचा राखीव निधी ९१ हजार कोटींवरून ८१ हजार कोटींवर
soybean procurement deadline extension news in marathi
सोयाबीन खरेदीस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून मान्य
rte registration process starting from Tuesday January 14
आरटीई प्रवेशांसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून, किती जागा उपलब्ध?
Maharera , Registration , New Housing Project,
स्वयंविनियामक संस्थेतील प्रतिनिधींची आता दोन वर्षांसाठीच नियुक्ती, दोन वर्षांनंतर प्रतिनिधी बदलावे लागणार
MPSC announced that it will now conduct screening exams for 33 posts of various types
मोठी बातमी: ‘एमपीएससी’कडून तब्बल ३३ पदांच्या चाळणी परीक्षेसाठी…
Tata Education Trust makes substantial provision for 115 employees Mumbai news
‘टीस’च्या कर्मचाऱ्यांना मार्च २०२६ पर्यंत दिलासा; टाटा एज्युकेशन ट्रस्टकडून ११५ कर्मचाऱ्यांसाठी भरीव तरतूद

हेही वाचा…टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या कुलपतीपदी धीरेंद्र पाल सिंग

मुंबई मंडळाला या भूखंड विक्रीतून किमान १२५ कोटींचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे. या १७ भूखंडांच्या ई लिलावासाठी निविदा सादर करण्याची अंतिम मुदत २६ एप्रिल अशी होती. मात्र आचारसंहिता आणि ई लिलावास अधिक प्रतिसाद मिळावा या उद्देशाने निविदा सादर करण्याची मुदत संपण्यापूर्वीच निविदा प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अखेर आता निविदा प्रक्रियेस ७ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Story img Loader