मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २,०३० घरांच्या सोडतीतील निवासी दाखला मिळालेल्या आणि स्वीकृती दिलेल्या विजेत्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या विजेत्यांना सोमवारपासून तात्पुरते ई देकारपत्र वितरीत करण्यात येणार आहे. हे देकारपत्र वितरीत झाल्यानंतर विहित मुदतीत सदनिकेची विक्री किंमत अदा करून संबंधित विजेत्यांना घराचा ताबा घेता येणार आहे.

मुंबई मंडळाने ८ ऑक्टोबर रोजी मुंबईतील विविध ठिकाणच्या २,०३० घरांसाठी सोडत काढली होती. २,०३० घरांसाठी एक लाख १३ हजारांहून अधिक अर्जदार सोडतीत सहभागी झाले होते. २०३० पैकी १३ घरांना शून्य प्रतिसाद मिळाल्याने प्रत्यक्षात २,०१७ घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. सोडतीनंतर २,०१७ विजेत्यांना मंडळाकडून ई स्वीकृती पत्र वितरीत करण्यात आले होते. त्यानुसार २,०२७ पैकी १,५३० विजेत्यांनी घरासाठी स्वीकृती दिली असून ४४२ विजेत्यांनी घर परत (सरेंडर) केले आहे. त्याचवेळी ४५ विजेत्यांनी स्वीकृतीही दिलेली नाही वा घर परतही केलेले नाही. सोडतीमधील निवासी दाखला मिळालेल्या घरांसाठी स्वीकृती दर्शविलेल्या विजेत्यांना आता तात्पुरते ई देकारपत्र वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तात्पुरते ई देकारपत्र वितरीत करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून विजेत्यांना सोमवारपासून तात्पुरते ई देकारपत्र वितरित केले जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

mhada
म्हाडा मुंबई मंडळ सोडत ऑक्टोबर २०२४ : २०१७ पैकी ४०० हून अधिक घरे परत, तर १५३० विजेत्यांची घरासाठी स्वीकृती
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Mhada mumbai
म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२४ : सुमारे ४४२ घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी
Bigg Boss Marathi Ankita Walawalkar Meets Suraj Chavan
अखेर भेट झालीच! होणाऱ्या नवऱ्यासह अंकिता पोहोचली बारामतीला; सूरजच्या गावच्या शेतात बसून मारला ‘या’ पदार्थावर ताव
Arjun Kapoor Confirms Breakup With Malaika Arora
Video: ६ वर्षांचं नातं संपलं, मलायकाचं नाव ऐकू येताच राज ठाकरेंच्या शेजारी उभा असलेला अर्जुन कपूर म्हणाला…
MHADA Mumbai Lottery 2024 Last eight days for winners to submit acceptance letter Mumbai news
म्हाडा मुंबई सोडत २०२४: स्वीकृती पत्र सादर करण्यासाठी विजेत्यांना अखेरची आठ दिवसांची मुदत
Priya bapat sings kajra mohabbat wala 56 years old song
प्रिया बापटने गायलं ५६ वर्षांपूर्वीचं सुपरहिट बॉलीवूड गाणं! सुमधूर आवाजाचं सर्वत्र होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, “अप्रतिम…”

हेही वाचा – Wani Assembly Constituency: वणी विधानसभेत बंडखोरी होण्याची शक्यता; चौरंगी लढत झाल्यास भाजपच्या पथ्यावर पडणार

हेही वाचा – आजी विरुद्ध माजी गृहमंत्र्यांमधील लढतीची अफवाच ठरली …..

तात्पुरते ई देकारपत्र मिळाल्यापासून विजेत्यांना ४५ दिवसांत सदनिकेच्या एकूण रक्कमेच्या २५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम ४५ दिवसांत भरू न शकणाऱ्या विजेत्यांना त्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. मात्र यासाठी विजेत्याला व्याज भरावे लागणार आहे. एकूणच या ६० दिवसांच्या मुदतीत २५ टक्के रक्कम न भरल्यास घराचे वितरण रद्द होणार आहे. २५ टक्के रक्कम भरल्यानंतर विजेत्यांना उर्वरित ७५ टक्के रक्कम भरण्यासाठी पुढे ६० दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. या ६० दिवसांच्या मुदतीत ७५ टक्के रक्कम भरून विजेत्यांना घराचा ताबा घेता येणार आहे. या मुदतीत ७५ टक्के रक्कम भरणार नाहीत, त्यांना ९० दिवसांची मुदत व्याज आकारणीसह देण्यात येईल. घराची रक्कम भरण्याची एकूण १९५ दिवसांची मुदत संपुष्टात आल्यानंतरही घराची १०० टक्के रक्कम न भरणाऱ्या विजेत्याच्या घराचे वितरण रद्द करून त्या जागी प्रतीक्षा यादीवरील विजेत्याला संधी दिली जाणार आहे.

Story img Loader