मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाला मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून सोडतीसाठी प्राप्त झालेली ताडदेवमधील घरे काही केल्या विकली जात नसल्याचे चित्र आहे. येथील पावणे सात कोटींच्या सात घरांपैकी चार घरे विक्रीवाचून पडून आहेत. चारपैकी एका घराचा २०२४ च्या सोडतीत मंडळाने समावेशच केलेला नाही तर उर्वरित तीन घरे विजेत्यांनी परत (सरेंडर) केली आहेत. उर्वरित एका घरासाठी प्रतीक्षा यादी कार्यान्वित केली जाणार आहे. दोन घरांसाठी विजेत्यांनी अद्यापही स्वीकृती न दिल्याने ती घरे विकली जाणार का याची चिंता मुंबई मंडळाला लागली आहे.

दुरुस्ती मंडळाकडून मुंबई मंडळाला २०२३ च्या सोडतीसाठी ताडदेवमधील क्रीसेंट टॉवरमधील १४१.३० चौ. मी. आणि १४२.३० चौ. मीटरची अशी एकूण सात घरे उपलब्ध झाली होती. २०२३ मध्ये या घरांसाठी सोडत काढण्यात आली. उच्च गटातील ही घरे आतापर्यंतच्या म्हाडाच्या सोडतीतील सर्वात महागडी घरे ठरली. या घरांच्या किंमती साडे सात कोटींच्या घरात होत्या. म्हाडाच्या किंमतीनुसार ही घरे महाग असली तरी बाजारभावाच्या तुलनेत ती स्वस्त असल्याने ती विकली जातील असा विश्वास मुंबई मंडळाला होता. मात्र २०२३ च्या सोडतीत सातपैकी एकही घर विकले गेलेले नाही. या घरांसाठी लोकप्रतिनिधीही विजेते ठरले होते, मात्र त्यांनीही घरे स्वीकारलेली नाहीत. त्यामुळे शेवटी या घरांचा समावेश मंडळाने २०२४ च्या सोडतीत केला आहे. दरम्यान म्हाडाने २०२४ च्या घरांच्या सोडतीत किंमती १० ते २५ टक्क्यांनी कमी केल्याने या घरांच्या किंमती ७५ लाखांनी कमी होऊन त्या पावणे सात कोटींच्या घरात गेल्या. दरम्यान २०२४ मध्ये सातपैकी एक घर वगळत सहा घरांचा समावेश सोडतीत करण्यात आला होता. एक घर का वगळण्यात आले याचे कोणतेही समाधानकारक उत्तर मंडळाकडून देण्यात आलेले नाही.

Athavale claim chairman of trust running Siddharth college
‘पीपल्स’च्या अध्यक्षपदावर रामदास आठवले यांचा दावा; जुन्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी ५०० कोटींच्या निधीची मागणी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Andheri zopu yojana, Eligibility , Disqualification ,
अंधेरीतील झोपु योजनेत मृत व्यक्तींच्या नावे पात्रता! आणखी सहा झोपडीवासीयांची पात्रता रद्द
khasdar krida mahotsav, Yashwant Stadium,
नितीन गडकरी म्हणाले, “नागपुरात एक लाख कोटींची कामे केली, पण…”
Water connections of 245 houses disconnected due to water theft
पाणी चोरी भोवली, २४५ घरांची नळ जोडणी तोडली
Three generations of 74 Panvel tribal families remain homeless
तीन पिढ्यांच्या वास्तव्यानंतर आदिवासी हक्काच्या घरापासून वंचित, पनवेलच्या विकास आराखड्यातील हरकतीवर सुनावणी
वाकडमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा; १३७ शेड, १८ घरे जमीनदोस्त
Versova-Bhyander Coastal Road Project, contracts ,
वर्सोवा-भाईंदर किनारपट्टी मार्ग प्रकल्पाचे गौडबंगाल, महापालिका अधिकाऱ्यांकडून २२ हजार कोटींची खैरात

हेही वाचा…Metro 3 : मुंबईकरांसाठी खुशखबर! कुलाबा ते बीकेसी मेट्रो ३ चा प्रवास ‘या’ महिन्यापासून होणार सुरू; मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती!

u

आगामी सोडतीत समावेश

मंडळाच्या २०२४ च्या सोडतीतील ताडदेवमधील या सहा घरांना चांगला प्रतिसाद मिळाला. पण जेव्हा प्रत्यक्षात विजेत्यांकडून स्वीकृती पत्र घेण्याची वेळ आली तेव्हा चार विजेत्यांनी घरे परत केली, तर दोन विजेत्यांनी स्वीकृती पत्रच दिले नाही.

परत करण्यात आलेल्या चार पैकी एकाच घरासाठी प्रतीक्षा यादीवरील विजेता असल्याने प्रतीक्षा यादी कार्यान्वित केली जाणार आहे. तर उर्वरित दोन विजेत्यांना स्वीकृती पत्र सादर करण्यासाठी स्मरणपत्र देत मुदतवाढ दिली जाणार असल्याची माहिती मंडळातील सूत्रांनी दिली.

ही घरे मोक्याच्या ठिकाणी आणि प्रशस्त इमारतीत आहेत. घरांच्या किमती बाजारभावाच्या तुलनेत कमी आहेत. असे असतानाही या घरांना का प्रतिसाद मिळत नाही हा सर्वांच प्रश्न असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रतिसाद न मिळालेल्या घरांचा समावेश आगामी २०२५ च्या सोडतीत केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

मानखुर्द टी जंक्शन भुयारी मार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात

(पान १वरून) अनेक वेळा भुयारी मार्गात खड्ड्यांमुळे अपघात झाले आहेत. भुयारी मार्गात दिव्यांसाठी सुविधा नसल्याने काळोखातूनच नागरिकांना ये-जा करावी लागते. पावसाळ्यात ही समस्या आणखी जटिल होते. पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा नसल्याने दोन्ही भुयारी मार्ग जलमय होतात. नागरिकांना नाईलाजाने रेल्वे रूळ ओलांडून जावे लागते. महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी केल्यानंतरही भुयारी मार्गाच्या डागडुजीला मुहूर्त मिळाला नव्हता. निवडणुकीपूर्वी या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीची घोषणाही करण्यात आली होती. मात्र, दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. आता महापालिकेने भुयारी मार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी टप्प्याटप्प्याने काम केले जाणार आहे. रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासह रंगरंगोटी करून भुयारी मार्ग सुशोभित केला जाईल. तसेच, भुयारी मार्गावर छतही बसविण्यात येणार आहे.

हेही वाचा…कुर्ला बेस्ट अपघातातील आणखी एका जखमीचा मृत्यू, मृतांची संख्या नऊ

या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीच्या कामासाठी राबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कंत्राटदाराला कार्यादेश दिल्यांनतर दोन – तीन दिवसांपूर्वी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. येत्या ३ महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान, येथील वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहील, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.

Story img Loader