म्हाडातील रिक्त ५६५ पदांच्या भरतीसाठी जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला. म्हाडाने ५६५ पैकी ५३३ पदांचा निकाल जाहीर केला. म्हाडाच्या https://www.mhada.gov.in/en या संकेतस्थळावर उमेदवारांना निकाल पाहता येईल.
म्हाडाने सरळ सेवा भरतीअंतर्गत अर्ज मागविले होते. या भरतीला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिकेत बदली सत्र सुरूच ; पुन्हा अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि निर्णय मागे घेण्याचा घाट
दोन लाखांहून अधिक अर्ज सादर झाले होते. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यात मोठा गैरव्यवहार झाला, अनेकांना अटक झाली आणि ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर म्हाडाने रिक्त पदांच्या भरतीसाठी टीसीएसच्या माध्यमातून जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ऑनलाइन परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल बुधवारी म्हाडाने जाहीर केला. या निकालानुसार आता निवडयादीतील उमेदवारांना नियमानुसार सेवेत समावून घेण्यात येणार आहे.