मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीतील १३२७ घरे निर्माणाधीन प्रकल्पातील आहेत. या घरांचे काम पूर्ण होऊन त्यांना डिसेंबर २०२४ पर्यंत निवासी दाखला मिळण्याची शक्यता आहे. या घरांसाठी विजेते ठरणाऱ्यांना त्याचा ताबा २०२५ मध्ये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोडतीनंतर विजेत्यांना घराच्या ताब्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई मंडळाच्या सोडतीची प्रतीक्षा संपली आहे. २०३० घरांच्या सोडतीची जाहिरात गुरुवारी प्रसिद्ध झाली. तर शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून अर्ज विक्री – स्वीकृतीस सुरुवात होणार आहे. सोडतपूर्व प्रक्रिया पूर्ण करून १३ सप्टेंबर रोजी सोडतीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, म्हाडाने सोडतीची संपूर्ण प्रक्रिया संगणकीय करून सोडत प्रक्रियेत बदल केले आहेत. त्यानुसार आता अर्ज भरतानाच इच्छुकांना आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागत आहेत. तर सोडतीपूर्वीच अर्जदारांची पात्रता निश्चिती करून पात्र अर्जदारांसाठीच सोडत काढली जात आहे. सोडत झाल्यानंतर पात्रता निश्चितीसाठी बराच काळ लागतो. त्यामुळे म्हाडाने सोडत प्रक्रियेत बदल करून सोडतीपूर्वीच पात्रता निश्चितीचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी २०२३ पासून सुरू केली आहे.

हेही वाचा…मुंबई : वाद्यनिर्मिती, बांधणीसाठी कारागिरांचा शोध

तर घराचा ताबा तात्काळ देता यावे यासाठी सोडतीत निवासी दाखला मिळालेल्या घरांचाच समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी सोडतीनंतर काही दिवसांतच घरांचा ताबा देण्याचा दावाही केला. त्यानुसार २०२३ च्या सोडतीनंतर काही महिन्यातच मोठ्या संख्येने विजेत्यांना घराचा ताबा देण्यात मुंबई मंडळ यशस्वी ठरले आहे. पण २०२४ च्या सोडतीतील निम्म्याहून अधिक विजेत्यांना मात्र घराच्या ताब्यासाठी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा…‘न्यूरोइम्युनोलॉजी’ रुग्णसंख्येत वाढ, नायर रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग वरदान

निवासी दाखला मिळालेली घरे

पवई कोपरी, पहाडी गोरेगाव आणि अन्य ठिकाणच्या घरांचा यात समावेश आहे. या घरांची कामे येत्या काही महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर काम पूर्ण करून इमारतींना निवासी दाखला घेण्याची प्रक्रिया डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया नव्या वर्षात २०२५ मध्येच सुरू होण्याची शक्यता आहे. सोडतीनंतर काही दिवसांत घराचा ताबा देण्याचे धोरण म्हाडाने स्वीकारले आहे. त्यासाठी बांधकाम पूर्ण झालेल्या आणि निवासी दाखला मिळालेल्या घरांचा सोडतीत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada s 2024 lottery in mumbai 1327 homes under construction possession expected by 2025 mumbai print news psg