वारंवार सूचना देऊनही आठ कोटी रुपयांची थकबाकी न भरणाऱ्या ‘पंक्ती डेव्हलपर्स’ या खासगी विकासकाची दोन बँक खाती ‘म्हाडा’ने सील केली आहेत. धारावी येथे झोपडपट्टी पुनवर्सन प्रकल्पांतर्गत वल्लभ सहकारी गृहनिर्माण संस्था, शिवनेरी सहकारी गृहनिर्माण संस्था व ओम दत्त सहकारी गृहनिर्माण संस्था या २१३ गाळे असणाऱ्या तीन सोसायटय़ांच्या पुनर्विकासाची जबाबदारी रमेश डेडियार यांच्या ‘पंक्ती डेव्हलपर्स’ वर होती. ‘पंक्ती’कडे ‘वल्लभ’ची तीन कोटी ३२ लाख रुपये, ‘शिवनेरी’ची तीन कोटी ८१ लाख, ‘दत्त सहकारी’ची ८६ लाख ८३ हजार अशी एकूण आठ कोटी रुपयांची थकबाकी होती.
याबाबत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी मोहन ठोंबरे यांनी थकबाकी वसुलीचे पत्र पाठवले होते. त्यानंतर पाठपुरावा करणारी पत्रे तीन वेळा पाठवण्यात आली.
या प्रकरणी अखेर फेब्रुवारीत सुनावणी लागली. त्यावेळी तीन दिवसांत खुलासा करण्याचे आश्वासन ‘पंक्ती डेव्हलपर्स’ने दिले. पण त्यानंतरही खुलासा न आल्याने अखेर रमेश डेडियार यांच्या ‘पंक्ती डेव्हलपर्स’ यांची दोन खाती सील करण्यात आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा