मुंबई : म्हाडाने ‘मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हब’अंतर्गत मुंबई आणि एमएमआरमध्ये वृद्धाश्रम, तसेच नोकरदार महिलांसाठी वसतीगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडा एमएमआरमधील पहिला वृद्धाश्रम आणि नोकरदार महिलांसाठी वसतीगृह ठाण्यात बांधणार आहे. ठाण्यातील माजीवाडा येथील एक जागा यासाठी निश्चित करण्यात आली असून एकाच भूखंडावर बाजूबाजूला वृद्धाश्रम आणि वसतीगृह बांधण्यात येणार आहे.

‘एमएमआर ग्रोथ हबम’ध्ये आठ लाख घरांची निर्मिती करण्यासाठी म्हाडाने सविस्तर आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे बांधतानाच समाजातील इतर घटकांना हक्काचा निवारा उपलब्ध करण्याची एक वेगळी संकल्पना म्हाडाने पुढे आणली आहे. त्यानुसार निराधार वृद्धांसाठी वृद्धाश्रम, तसेच नोकरदार महिलांना सुरक्षित निवारा उपलब्ध करण्यासाठी वसतीगृह बांधण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई मंडळ मुंबईत तीन वृद्धाश्रम आणि नोकरदार महिलांसाठी सात वसतिगृहे बांधणार आहे. तर, कोकण मंडळ मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) दोन वृद्धाश्रम आणि नोकरदार महिलांसाठी सहा वसतिगृहे बांधणार आहे. यासंबंधीचा निर्णय झाल्यानंतर कोकण मंडळाने पहिल्या वृद्धाश्रमासह वसतीगृहासाठी जागा निश्चित केल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Conditional possession to eligible tenants on comprehensive list decision of MHADA Vice Chairman
बृहतसूचीवरील पात्र भाडेकरुंना सशर्त ताबा, म्हाडा उपाध्यक्षांचा निर्णय
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
pune best city for women loksatta news
महिलांना काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट असलेल्या पहिल्या पाच शहरांत पुण्याला स्थान
BDD chawl redevelopment, houses Worli ,
बीडीडी चाळ पुनर्विकास : वरळीतील ५५० घरांचा ताबा मार्चमध्ये, म्हाडाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात घरांच्या वितरणाचा समावेश
Shelu and Wangani housing project opposed by mill worker
वांगणीतील घरे नापसंत, प्रकल्प रद्द करण्याची गिरणी कामगारांच्या संघटनांची मागणी, तर शेलूतील घरांच्या किमती सहा लाख करा, मुख्यमंत्र्यांना पत्र
second phase of Taliye rehabilitation will be completed in June
तळीये पुनर्वसनाचा दुसरा टप्पा जूनमध्ये पूर्ण
Mumbai, MHADA , houses MHADA ,
मुंबई : पत्राचाळीत सर्वसामान्यांसाठी म्हाडाची आणखी १,४५६ घरे
Corporator Raj contract works Navi Mumbai corporators
नवी मुंबई : कंत्राटी कामांमध्ये ‘नगरसेवक राज’, प्रशासकाच्या काळातही प्रभावी नगरसेवकांची चलती

हेही वाचा >>>मालाडमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन

ठाण्यातील माजीवाडा येथे एमएमआरमधील पहिले वृद्धाश्रम आणि नोकरदार महिलांसाठी वसतीगृह बांधण्यात येणार आहे. एकाच भूखंडावर वृद्धाश्रम आणि वसतीगृहाच्या स्वतंत्र इमारती बाधण्यात येणार आहेत. सात मजली वृद्धाश्रम आणि वसतीगृह बांधण्यासंबंधीचा प्रस्ताव मंडळाने तयार केला आहे. हा प्रस्ताव लवकरच म्हाडा उपाध्यक्षांसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

Story img Loader