मुंबई…म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या डिसेंबरमधील बृहतसूचीवरील २६५ घरांच्या सोडतीतील गैरप्रकारच्या चौकशीचा अहवाल अद्याप सादर झालेला नाही. असे असताना हा अहवाल सादर न करता दुरूस्ती मंडळाने १५८ पात्र विजेत्यांना मंगळवारी देकार पत्र वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते एका कार्यक्रमात म्हाडा भवनात प्रातिनिधीक स्वरूपात ५० जणांना देकार पत्र दिली जाणार आहेत.

दुरूस्ती मंडळाकडून डिसेंबरमध्ये बृहतसूचीवरील २६५ घरांसाठी सोडत काढण्यात आली. बृहतसूचीवरील घरांच्या सोडतीत मोठा गैरप्रकार आणि भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच ही सोडत आॅनलाईन पद्धतीने काढली गेली. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शी असल्याचा दावा करण्यात आला. मात्र अवघ्या काही दिवसातच हा दावा फोल ठरला. या सोडतीत दुरुस्ती मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार एक अर्जदार अपात्र असताना, त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे अर्ज केल्याचे स्पष्ट झाले. तरीही त्या विजेत्याचा समावेश सोडत प्रक्रियेत करण्यात आला. हा अर्जदार दक्षिण मुंबईतील मोक्याच्या आणि मोठ्या चार घरांसाठी विजेता ठरला आहे. ट्रान्झिट कॅम्प असोसिएशनचे अध्यक्ष अभिजीत पेठे यांनी यासंबंधीची तक्रार म्हाडा उपाध्यक्षांकडे केली. त्यानंतर या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली. दरम्यान संबंधित अर्जदारासह अन्यही काही बनावट अर्जदार असल्याचे पेठे यांनी तक्रारीत नमुद केले होते. त्यानुसार सर्व २६५ विजेत्यांच्या कागदपत्रांची पुर्नपडताळणी करण्याचेही आदेश जयस्वाल यांनी दिले.

mohan bhagwat
Mohan Bhagwat : “घरवापसीमुळे आदिवासी देशद्रोही झाले नाहीत!” प्रणब मुखर्जींच्या विधानाचा मोहन भागवतांनी दिला दाखला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
friend beaten , loan , Pune, Bhosari, pune news,
पुणे : उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मित्राला लाकडी दांडक्याने मारहाण
305 winners of mhadas 2016 postal lottery finally received their houses
३०५ विजेत्यांची आठ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात, पत्राचाळ योजनेतील घरांना निवासी दाखला
Sukesh Chandrasekhar Letter to Nirmala Sitharaman
ठग सुकेश चंद्रशेखरचं अर्थमंत्री सीतारामण यांना पत्र; ७,६४० कोटी रुपयांचा कर भरण्याची तयारी
Devdutt Padikkal smashes hundred in quarterfinal against Baroda in Vijay Hazare Trophy 2025
Vijay Hazare Trophy : १५ चौकार अन् २ षटकार… देवदत्त पडिक्कलची शतकी खेळी बडोद्यावर पडली भारी
Image of a lottery ticket
स्वप्नात दिसलेल्या नंबरचे लॉटरी तिकिट घेतले अन् महिला जिंकली ४२ लाख रुपये; पती म्हणाला, “मला काही हे…”
Kalyan elder brother killed younger brother dispute
कल्याणमध्ये ५०० रूपयांच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून

हेही वाचा >>> Ravindra Waikar : रवींद्र वायकर अडचणीत? लोकसभेतील विजयाविरोधात अमोल कीर्तिकरांच्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाचं समन्स

जानेवारीपासून यासंबंधीची चौकशी सुरु असून सहा महिने उलटले तरी अहवाल दुरूस्ती मंडळाकडून सादर झालेला नाही किंवा नेमके किती अपात्र किंचा बनावट अर्जदार आढळले, त्याचीही माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. असे असताना आता मंगळवारी या सोडतीतील १५८ विजेत्यांना देकार पत्राचे वाटप करण्यात येणार आहे. त्यावर पेठे यांनी आक्षेप घेतला आहे. दुरूस्ती मंडळाने मात्र ज्यांना देकार पत्र वितरीत करण्यात येणार आहे ते पात्र विजेते असून त्यांच्या कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करण्यात आली आहे. अशा पात्र विजेत्यांना विनाकारण घरासाठी वाट पाहायला लावणे योग्य नसल्याचे म्हणत देकार पत्र वितरणाचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती दुरूस्ती मंडळातील एका वरिष्ठ अधिकार्याने दिली आहे.

हेही वाचा >>> खासदारकीला आव्हान, वायकर यांना उच्च न्यायालयाचे समन्स, अमोल कीर्तीकरांच्या आरोपांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

आतापर्यंत २१२ विजेते पात्र

बृहतसुचीवरील २६५ विजेत्यांपैकी चार घरांसाठी संबंधित अर्जदारास अपात्र ठरवत त्याचे घराचे वितरण रद्द करण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. तेव्हा २६१ पैकी २१२ विजेते आतापर्यंत पात्र ठरल्याचे अधिकार्यांनी सांगितले. २१२ पैकी १५८ जणांनी स्वीकृती पत्र सादर केले आहे. त्यामुळे या १५८ जणांना मंगळवारी देकार पत्र वितरीत केले जाणार आहे. तर ५० जणांना प्रातिनिधिक स्वरूपात सावे यांच्या हस्ते देकार पत्र दिले जाणार आहे. दरम्यान ५४ पात्र विजेत्यांनी अद्याप स्वीकृती पत्र दिलेले नाही. विहित मुदतीत त्यांनी पत्र सादर न केल्याचे त्यांचे घराचे वितरण रद्द होणार आहे.

५३ विजेते संशयाच्या भोवर्यात

दुरूस्ती मंडळाच्या चौकशीत ५३ विजेते संशयाच्या भोवर्यात अडकले आहेत. त्यांच्या कागदपत्राबाबत संशय असून त्यांची एकदा पडताळणी करण्यात आली असून आता पुन्हा एकदा पडताळणी करण्यात येत असल्याचेही अधिकार्यांनी सांगितले. तर यात जे कोणी दोषी आढळले त्याचे घराचे वितरण रद्द करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader