मुंबै बँकेतील गैरकारभाराच्या चौकशी अहवालामुळे वादग्रस्त ठरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार प्रवीण दरेकर आणखी अडचणीत आले आहेत. घुसखोर रहिवाशांना जपण्यासाठी संक्रमण शिबिराच्या इमारतीच्या दुरुस्तीला सुरू केलेली बेकायदा मदत तातडीने थांबवावी अन्यथा पोलीस कारवाई करण्यात येईल, असा इशारा ‘म्हाडा’ने दरेकरांना पत्राद्वारे दिला आहे. तर दरेकर राजकीय हेतूने मतांच्या राजकारणासाठी घुसखोरांनापाठिशी घालत असल्याचा आरोप ‘म्हाडा’च्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती प्रसाद लाड यांनी केला.
मागाठाणे येथील जुनाट व मोडकळीस आलेल्या संक्रमण शिबिराच्या पुनर्विकासाचे काम ‘म्हाडा’ने हाती घेतले आहे. या ठिकाणी तीन इमारती असून सुमारे शंभर रहिवासी आहेत. पुनर्विकास झाल्यास आपला अवैध ताबा नष्ट होईल या भीतीने घुसखोरांनी इमारत दुरुस्त करण्याची धडपड सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी मनसे आमदार प्रवीण दरेकर यांच्या सा’ााने दुरुस्तीचा घाट घातला आहे. दरेकर यांनीही त्यास आशीर्वाद दिला आहे. संक्रमण शिबिराच्या दुरुस्तीसाठी इतर कोणीही खर्च करू शकत नाही. ‘म्हाडा’लाच तो अधिकार आहे. पण दरेकर बेकायदा दुरुस्तीसाठी आर्थिक सा’ा करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दरेकर यांना हे बेकायदा कृत्य तातडीने थांबवण्याचे आवाहन केले असून अन्यथा पोलीस कारवाईचा इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा