मुंबई: सोडतीत सामान्यांसाठी अधिकाधिक घरे उपलब्ध व्हावीत, यासाठी वांद्रे रेक्लेमेशन, आदर्शनगर (वरळी) आणि अभ्युदयनगर (काळा चौकी) येथील वसाहतींचा एकत्रित पुनर्विकास करण्याच्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) प्रयत्नांना रहिवाशांनी विरोध केला आहे. ज्या गोरेगाव येथील मोतीलाल नगर पुनर्विकासाच्या धर्तीवर म्हणजेच कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सीमार्फत पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे तेथे दोन वर्षे झाली तरी काहीही होऊ शकलेले नाही. मग आम्हाला अशा पुनर्विकासात कशाला अडकवता, असे या रहिवाशांचे म्हणणे आहे.

या वसाहतींच्या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी अपेक्षित असून सामान्यांसाठी सर्वाधिक घरे वा अधिमूल्य देणाऱ्या विकासकाची या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी निवड करण्यात येणार होती. याबाबत मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक होती. परंतु अद्याप हा प्रस्ताव मंजूर झालेला नाही. मंत्रिमंडळापुढे हा प्रस्ताव लवकरच सादर केला जाणार असल्याचे गृहनिर्माण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
ajit pawar expressed about obc vote in an interview given to the indian express
ओबीसींची एकगठ्ठा मते मिळणे कठीणच; महायुतीबाबत अजित पवार यांचे मत
batenge toh katenge slogan by bjp in maharashtra assembly election
‘बटेंगे…’चा मुद्दा राज्यातील प्रचारात केंद्रस्थानी कसा आला? भाजप आक्रमक, विरोधक सावध?
वक्फ मंडळ कायदा नरेंद्र मोदीच बदलणार; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा विश्वास; राहुल गांधींवर टीका
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”

हेही वाचा… दादरच्या शिवाजी पार्कमधील प्राणिसंग्रहालयाला महानगरपालिकेची नोटीस

म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी विकासकांकडून पुनर्विकासाच्या व विक्री करावयाच्या इमारती बांधून घ्यायच्या तसेच घरांचा साठा किंवा अधिमूल्य स्वरूपात वाटा घ्यायचा अशी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलमेंट एजन्सी पद्धत अमलात आणण्याचे ठरविण्यात आले होते. मोतीलाल नगर पुनर्विकासात त्याच धर्तीवर निविदा जारी करण्यात आला. अदानी रिअल्टी आणि एल अँड टी हे बडे विकासक स्पर्धेत आहेत. परंतु हे प्रकरण न्यायालयात अडकले आहे. या पुनर्विकासातून म्हाडाला ३३ हजार घरे सोडतीत विक्रीसाठी अपेक्षित आहेत. पण इतके वर्षे हा प्रस्ताव प्रत्यक्षात अमलात येत नसल्यामुळे म्हाडाने समूह पुनर्विकासाचा आग्रह धरू नसे, अशी मागणी वांद्रे रेक्लेमेशन, आदर्शनगर आणि अभ्युदयनगर या वसाहतींतील रहिवाशांनी केली आहे.

हेही वाचा… दसऱ्याला शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा आवाज घुमणार, शिंदे गटाचा अर्ज मागे; ‘या’ दोन मैदानांची चाचपणी

हा प्रस्ताव प्रलंबित असतानाच वांद्रे रेक्लेमेशन येथे दोन प्रस्तावांना म्हाडाने अलीकडे मंजुरी दिली. या ठिकाणी यापूर्वीही दोन इमारतींच्या पुनर्विकासाला परवानगी देण्यात आली होती. त्या शेजारील या इमारती असल्यामुळे समूह पुनर्विकासात अडथळा येणार नाही, असा दावा मुंबई गृहनिर्माण मंडळातील पुनर्विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. आदर्श नगरमध्येही एका इमारतीला निवासयोग्य प्रमाणपत्र मिळाले आहे तर एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र अभ्युदय नगर येथे एकाही इमारतीला परवानगी देण्यात आलेली नाही. एका इमारतीचा पुनर्विकास प्रस्ताव वर्षभरापासून प्रलंबित आहे. मात्र अशा परवानग्या दिल्यानंतर म्हाडाला अन्य इमारतींचे प्रस्तावही विचारात घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे शासनाकडून एकत्रित पुनर्विकासाचा प्रस्ताव मंजूर होत नसल्यामुळे म्हाडालाही रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

अशा आहेत वसाहती

वांद्रे रेक्लेमेशन – ५५ एकर, ३१ इमारती (१६३२ रहिवासी)
आदर्श नगर (वरळी) – ३४ एकर, ६६ इमारती (१४३९ रहिवासी)
अभ्युदयनगर (काळा चौकी) – ३३ एकर, ४९ इमारती (३३५० रहिवासी)