मुंबई : काळाचौकी येथील अभ्युदयनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या निविदेला तिसऱयांदा मुदतवाढ देऊनही विकासकांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता निविदेला चौथ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की मुंबई मंडळावर आली आहे. त्यानुसार निविदेला आता ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मूळ भाडेकरूंना ६३५ चौ. फुटे देत प्रकल्प राबविणे व्यवहार्य ठरत नसल्याने विकासक पुढे येत नसल्याचे म्हटले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काळाचौकीतील ३३ एकरवर ४९ इमारतींचा पुनर्विकास अनेक वर्षांपासून रखडला आहे. ३३५० सदनिकांचा समावेश असलेल्या इमारतींचा खडलेला हा पुनर्विकास मार्गी लावण्याची जबाबदारी अखेर राज्य सरकारने म्हाडावर टाकली आहे. ही जबाबदारी आल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाने मोतीलाल नगरच्या धर्तीवर कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेंट एजन्सी प्रारुपानुसार करण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर मंडळाने आॅक्टोबर २०२४ मध्ये पुनर्विकासासाठी निविदा प्रसिद्ध केल्या. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत २२ नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र या मुदतीत निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

हेही वाचा…मुंबई : बेस्ट बसचा प्रवास रखडला, प्रवासी बस थांब्यावरच उभे

तिसरी मुदतवाढ १० जानेवारीला संपली असून त्या कालावधीत एकही कंत्राट न आल्याने निविदेला चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. मुदतवाढीनुसार आता ३० जानेवारीपर्यंत निविदा सादर करता येणार आहेत. चौथ्या मुदतवाढीत प्रतिसाद मिळाला नाही तर पुढे काय निर्णय घ्यायचा याची विचारणा राज्य सरकारकडे करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱयाने सांगितले. त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्य नेमके काय असेल हे ३० जानेवारीनंतर स्पष्ट होईल. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने प्रकल्पास विलंब होणार आहे. दरम्यान मंडळाच्या प्रस्तावानुसार मूळ भाडेकरूंना ५०८ चौ. फुटाची घरे देणे व्यवहार्य ठरेल असे म्हणत मंडळाने त्यानुसारच निविदा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रहिवाशांनी ६५० चौ. फुटाच्या घराची मागणी केली. ही मागणी मान्य करून ६३५ चौ. फुटाप्रमाणे निविदा काढण्यात आल्या. मात्र ६३५ चौ. फुटाची घरे देत पुनर्विकास प्रकल्प राबविणे व्यवहार्य ठरत नसल्याने विकासक पुढे येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मंडळाची मोठी अडचण झाली आहे.