लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमांच्या घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिकामधील प्रश्न आणि उत्तर तालिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केली असून विद्यार्थ्यांच्या त्यांचा लॉगिन आयडी वापरून यावर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविण्यास २२ मे पासून संकेतस्थळावर संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान काही शंका असल्यास त्यांनी संकेतस्थळावर नोंदवावा, असे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा (सीईटी सेल)कडून करण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा २२ ते ३० एप्रिल २०२४ दरम्यान पीसीबी ग्रुप आणि २ ते १६ मे २०२४ या कालावधीत पीसीएम ग्रुपची परीक्षा घेण्यात आली होती. या दोन्ही परीक्षांची उत्तर तालिका आणि उमेदवारांनी सोडविलेले प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या लॉगीन आयडीवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि उत्तर तालिका यांच्यावर आक्षेप असल्यास विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जाऊन प्रति आक्षेप १००० रुपये भरुन आक्षेप नोंदवावा असे आवाहन सीईटी सेलकडून करण्यात आले आहे.
आणखी वाचा-घाटकोपर, भांडुप व मुलुंडमध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद
आक्षेप नोंदवण्यासाठी वेळापत्रक
पीसीबी ग्रुप – २२ ते २४ मे २०२४
पीसीएम ग्रुप – २४ ते २६ मे २०२४०