मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राबविण्यात येणाऱ्या आयुष आणि फिजिओथेरपी, ॲक्युपेशनल थेरपी, प्रोस्थेटिक ॲण्ड ऑर्थो आणि स्पीच ॲण्ड लॅग्वेज पॅथोलॉजी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार आयुष विभागातील आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीला २९ सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. फिजिओथेरपी, ॲक्युपेशनल थेरपी, प्रोस्थेटिक ॲण्ड ऑर्थो आणि ऑडियो, स्पीच ॲण्ड लॅग्वेज पॅथोलॉजी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीला ५ ऑक्टोबरपासून सुरूवात हाेणार आहे.

आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी या पदवी अभ्यासक्रमाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून दुसरी फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार २९ सप्टेंबर रोजी या अभ्यासक्रमांच्या जागांचा तपशील जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा ऑनलाईन पसंतीक्रम भरता येणार आहे. दुसरी फेरीची गुणवत्ता यादी ४ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार असून, ५ ते ९ ऑक्टोबरदरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहेत.

bsc nursing admission 1600 posts
राज्यात बीएस्सी नर्सिंगच्या १६०० जागा रिक्त, संस्थात्मक प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
After Diwali municipalitys secondary division school timings changed again
माध्यमिक शाळांच्या वेळेत दिवाळी सुट्टीनंतर बदल, माध्यमिक शाळा पूर्वीप्रमाणेच सकाळी ८ ते २ या वेळेत
Today is the last day to apply for various courses of Idol Mumbai print news
‘आयडॉल’च्या विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द

हेही वाचा : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ७५ हजार जागा वाढणार, येत्या पाच वर्षांत जागा वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

फिजिओथेरपी, ॲक्युपेशनल थेरपी, प्रोस्थेटिक ॲण्ड ऑर्थो आणि ऑडियो, स्पीच ॲण्ड लॅग्वेज पॅथोलॉजी या अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या फेरीला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या अभ्यासक्रमांच्या जागांचा तपशील ५ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान महाविद्यालयांचा ऑनलाईन पसंतीक्रम भरता येणार आहे. दुसऱ्या फेरीसाठीची गुणवत्ता यादी ९ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तर १० ते १३ ऑक्टोबरदरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे. दरम्यान, आयुष आणि फिजिओथेरपी, ॲक्युपेशनल थेरपी, प्रोस्थेटिक ॲण्ड ऑर्थो आणि स्पीच ॲण्ड लॅग्वेज पॅथोलॉजी अभ्यासक्रमाची तिसऱ्या प्रवेश फेरीचे तात्पुरते वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून, तिसऱ्या प्रवेश फेरीला १५ ऑक्टोबरपासून सुरूवात होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Mumbai Rain News: पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला

बीएस.सी नर्सिंगच्या अतिरिक्त फेरीचे वेळापत्रक जाहीर

भारतीय परिचर्या परिषदेने परिचारिका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम मुदत ३० सप्टेंबरवरून ३१ ऑक्टोबर केली होती. त्यामुळे बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची अतिरिक्त फेरी राबविण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाईन अर्ज नोंदणी करायची आहे. तर ३ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्क भरायचे आहे. ४ ऑक्टोबर रोजी अंतरिम गुणवत्ता यादी आणि जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे. ५ ते ९ ऑक्टोबरदरम्यान पसंतीक्रम भरायचा आहे. १० ऑक्टोबर रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असून ११ ते १६ ऑक्टोबरपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. १६ ऑक्टोबरपासून संस्थात्मक प्रवेश प्रक्रियेला सुरू होणार आहे तर विद्यार्थ्यांना १६ ऑक्टोबर रोजी प्रवेश रद्द करता येणार आहे. १७ ऑक्टोबर रोजी संस्थात्मक प्रवेश फेरीसाठीच्या जागांचा तपशील जाहीर केला जाईल. ही फेरी ३१ ऑक्टोबरपर्यंत चालेल.