मुंबई : दरवर्षीच्या शिरस्त्याप्रमाणे यंदाही ऑक्टोबर अखेरीस स्थलांतरित पक्ष्यांचे अर्थात परदेशी पाहुण्यांचे नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईच्या खाडीकिनारी आगमन झाले. गेले काही दिवस फ्लेंमिंगो आणि इतर विदेशी पक्ष्यांच्या थव्यांनी शहरांलगतच्या हिरवळ तसेच पाणथळ परिसराच्या सौंदर्यात भर घातली आहे. फ्लेमिंगोचे आगमन अद्याप मोठ्या संख्येने सुरू झालेले नाही. तरीही इतर काही विदेशी पक्ष्यांचा खाडीकिनारी विहार सुरू आहे. यात ‘ब्लू -टेलेड् बी-इटर आणि‘‘ब्लू-चिक्ड बी-इटर’ या पक्ष्यांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> मतदानासाठी सुट्टी न दिल्यास आस्थापनांवर कारवाई

Shah Rukh Khan meets fan from Jharkhand who waited for him outside Mannat for 95 days
Shah Rukh Khan : शाहरुख खानने ९५ दिवस ‘मन्नत’बाहेर थांबलेल्या चाहत्याची घेतली भेट, म्हणाला..
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Rumors bomb plane, Airline, Rumors bomb,
विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा, विमान कंपनीसह प्रवाशांना मनस्ताप
Mumbai air quality remains in moderate category
दिवाळीच्या दिवसांत मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच; कोणत्या भागातील हवा ‘अतिवाईट’?
India cancel intra-squad match With Team India A team to focus on net practice before Border-Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळापत्रकात मोठा बदल, ‘हा’ सामना केला रद्द, काय आहे कारण?
Mahabaleshwar, Tourism, Tourists, hill station
दिवाळी सुट्टीत पर्यटकांच्या स्वागतासाठी महाबळेश्वर सज्ज
new York schools Diwali holiday
न्यूयॉर्कमधील शाळांना पहिल्यांदाच दिवाळीची सुट्टी
pune Twitter user Adam Alanja 646 claimed there was bomb on Vistara flight UK 991
दिल्ली ते पुणे विमानात बॉम्ब असल्याच्या, अफवेने पुणे विमानतळवर पुन्हा खळबळ

नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा देशीविदेशी पक्ष्यांच्या स्थलांतराचा काळ मानला जातो. ऑक्टोबर अखेर या विदेशी पक्ष्यांच्या आगमनास आरंभ होतो. हे पक्षी हजारो किलोमीटर अंतर कापून नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई परिसरात येतात. पक्ष्यांसाठी आवश्यक खाद्या तसेच विस्तीर्ण पाणथळ जागा उपलब्ध असल्याने सैबेरिया आणि रशिया तसेच इतर देशांतून हे विविध पक्षी स्थलांतर करून मुंबई लगतच्या खाडीकिनारी दाखल होतात. यात प्रामुख्याने फ्लेमिंगो, सीगल, बी ईटर, समुद्री गरूड तसेच ‘ओपन हेड बील’ या प्रजातीतील पक्षी आढळून येतात.

हेही वाचा >>> कामाठीपुराचा पुनर्विकास ‘म्हाडा’ऐवजी पालिकेकडे ? विशिष्ट विकासकाच्या आग्रहामुळे निर्णय

‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने (बीएनएचएस) नवी मुंबईतील टी. एस. चाणक्य तलावानजीक पक्षी निरीक्षण आयोजित केले होते. त्या वेळी फ्लेमिंगोंच्या आगमनाला सुरुवात झाली होती. इतर काही विदेशी पक्षीही येण्यास आरंभ झाल्याचे पक्षीनिरीक्षकांनी सांगितले. निरीक्षणादरम्यान ‘ब्लू -टेलेड बी-इटर’ हा मेरोपिडे कुळातील पक्षी आहे. ही प्रजात दक्षिण आणि आग्नेय आशियात मोठ्या प्रमाणावर आढळून येते. ‘ब्लू -टेलेड बी-इटर’ प्रामुख्याने नदीच्या खोऱ्यांत, किनारपट्टीवर वास्तव्य करतो. हिरव्या रंगाच्या या पक्ष्याच्या चेहऱ्यावर काळ्या, निळ्या, पिवळ्या आणि तपकिरी रंगाचे पट्टे असतात. शेपटीचा रंग निळा आणि चोच काळी असते. ही प्रजाती सहसा पाण्याजवळ आढळते आणि ती प्रामुख्याने कीटक खाते.

पक्षीनोंदी भारतात एप्रिल ते मे दरम्यान या पक्ष्यांचा प्रजनन काळ असतो. भारत, म्यानमार आणि आग्नेय आशियातील काही भागांत या प्रजाती प्रजनन करतात. शिवाय ‘ब्लू-चिक्ड बी-इटर’ हा मेरोपिडे कुळातीलच पक्षी असून तो प्रामुख्याने इटली आणि ग्रीसमध्ये आढळून येतो. अलीकडे प्रथमच या पक्ष्याची श्रीलंकेतही नोंद झाली आहे.