मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. लवकरच पालिका निवडणुका होणार आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेकडून भ्रष्टाचार होत असल्याची टीका विरोधी पक्ष भाजपाकडून सातत्याने केली जात आहेत. अशातच आदित्यसेना मुंबई महानगर पालिकेत भ्रष्टाचार करण्याची एकही संधी गमावत नाहीये, असं म्हणत भाजपा आमदार मिहिर कोटेचा यांनी पुन्हा एकदा शिवसेनेसह आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय.
कोटेचा म्हणाले की, “काहीही करून आपल्या मर्जीतील ठेकेदार व कंपन्या यांनाच कंत्राटं मिळालं पाहिजे याची संपूर्ण सोय प्रशासनाला दबावात आणून केली जाते. तो प्रस्तावच यापद्धतीने तयार केला जातो की इतर कंपन्या सहभागी होतील पण पात्र ठरणार नाहीत,” असा आरोप भाजपाचे आमदार मिहिर कोटेचा यांनी केली.
“आदित्य ठाकरे यांनी तसाच डाव आता परत १४०० ईलेक्ट्रीक बसेस खरेदी कंत्राट ओलेक्ट्रा ग्रीनटेक या कंपनीला मिळावा यासाठी आखलाय. एकीकडे केंद्र सरकारचे २३४ कोटी खात्यात जमा झाल्यानंतर सुद्धा नेहमीप्रमाणे केंद्र सरकार पैसा देत नाही म्हणून बोंब मारायची आणि दुसरीकडे टक्केवारीसाठी लगबगीने सोयीस्कर निविदा काढायच्या. पण लक्षात ठेवा भाजपा असे होऊ देणार नाही. मुंबईकरांना मोकळा श्वास घेता यावा म्हणून मिळालेल्या केंद्र सरकारच्या निधीवर तुम्हाला टक्केवारीसाठी डल्ला मारू देणार नाही. आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी सिव्हीसी आणि कॅग यांच्याकडे आम्ही रितसर तक्रार दाखल करणार,” असं कोटेचा यांनी म्हटलंय.