गुन्हेगार लोकप्रतिनिधींना संरक्षण देण्यासाठी काढण्यात येणाऱ्या अध्यादेशाच्या विरोधात सूर लावण्याकरिता राहुल गांधी यांनी आपले निकटवर्तीय केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांच्याकडे जबाबदारी सोपविली होती. राहुल यांनी विरोध करण्याच्या आदल्या दिवशीच सोशल मीडियाच्या माध्यमातून देवरा यांनी लावलेला विरोधी सूर म्हणजे ‘राहुल नाटय़ाचा’ पायलट अ‍ॅपिसोड असल्याचे बोलले जाते.  
मिलिंद देवरा किंवा मुंबई काँग्रेसचे विक्रमी २२ वर्षे अध्यक्षपद भूषविलेले मुरली देवरा हे कधीच वादग्रस्त भूमिका घेत नाहीत.शिक्षा ठोठावल्या जाणाऱ्या लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द होऊ नये म्हणून कायद्याचे अधिष्ठान देण्याच्या अध्यादेशाच्या विरोधात काँग्रेसमधून पहिला आवाज उठविला तो मिलिंद देवरा यांनी. देवरा यांचे अध्यादेशाला विरोध करणारे ट्विट आले आणि तेव्हाच काँग्रेस नेत्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. राहुल ब्रिगेडमधील कोणीही पक्ष किंवा सरकारच्या विरोधात भूमिका घेत नाही. राहुल यांच्या अंतर्गत वर्तुळातील मिलिंद देवरा यांनी विरोध केला म्हणजे राहुल यांचा विरोध याची खूणगाठ काँग्रेस नेत्यांनी बांधली होती. लगेचच दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी हा अध्यादेश फाडून फेकून दिला पाहिजे वगैरे वक्तव्य केले.

Story img Loader