मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठोपाठ खासदार मिलिंद देवरा आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी कायद्याच्या चौकटीत राहून कॅम्पा कोलातील घरे वाचविण्यासाठी शक्यतो सर्व मदत करू,असे आश्वासन दिल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
देवरा आणि अहिर यांनी बुधवारी वरळीत रहिवाशांची भेट घेतली. रहिवाशांचे गाऱ्हाणे ऐकून घेतल्यानंतर देवरा म्हणाले की, कोणतीही चूक नसताना या रहिवाशांना फटका बसला आहे. कायद्याच्या चौकटीत बसवून त्यांच्यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांना विकासकाकडून आवश्यक कागदपत्रे मिळालेली नाहीत. याचाही विचार केला जाईल़  या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या रहिवाशांना संकटातून बाहेर काढण्यासाठी कायदेशीर बाबी विचारात घेतल्या जातील,
असे आश्वासन सचिन अहिर यांनी दिले.

Story img Loader