लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत पुरेशी मते नसतानाही शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने चुरस वाढली आहे. महाविकास आघाडीच्या तिसऱ्या उमेदवारामुळे मतांची फाटाफूट होण्याची चिन्हे आहेत.भाजपने पाच उमेदवारांची घोषणा केली. काँग्रेसने एकच उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसची अतिरिक्त मते आणि ठाकरे गटाच्या मतांच्या आधारे नार्वेकर यांचे गणित जमू शकते. पण राष्ट्रवादी शरद पवार गटाने शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

eknath shinde devdendra fadnavis
“कपटी लोकांनी आम्हाला छळलं”, शिंदेंच्या नेत्याची भाजपाच्या माजी केंद्रीय मंत्र्यावर टीका? महायुतीत जुंपली?
uddhav thackeray pradnya satav kharge
काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी, ठाकरे गटाच्या ‘त्या’ पत्राला केराची टोपली?
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Anil Parab and Niranjan Davkhare
मुंबईत शिवसेना उबाठाच! पदवीधर मतदारसंघात अनिल परब विजयी, तर कोकणचा गड भाजपाच्या डावखरेंनी राखला
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…

विधान परिषदेत निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या २३ मतांची आवश्यकता आहे. १०३ आमदार असलेल्या भाजपचे अपक्षांच्या मदतीने पाचही उमेदवार निवडून येऊ शकतात. ५० आमदारांचा पाठिंबा असलेल्या शिंदे गटाचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतील. ४२ आमदार असलेले अजित पवार गट दोन उमेदवार निवडून आणण्याच्या प्रयत्नात आहे. महायुतीचा ९ जागा जिंकण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. ठाकरे गट व शरद पवार गटाकडील मतांच्या आधारे एक उमेदवार निवडून येईल, पण शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने समीकरणे बदलली आहेत.महायुती ९ तर महाविकास आघाडी दोन जागा वाटून घेण्याची सत्ताधाऱ्यांची योजना होती. मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील रिंगणात राहिल्यास चुरस वाढू शकते.