मुंबई : दीड लाख गिरणी कामगारांना हक्काची घरे देण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत या मागणीसाठी मंगळवार, २५ जुलै रोजी गिरणी कामगारांनी मोर्चाची हाक दिली आहे. त्यानुसार आझाद मैदानावर होणाऱ्या या मोर्चासाठी गिरणी कामगार जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – मुंबई : पोलिसांच्या तत्परतेमुळे साडेतीन लाखांचा ऐवज सापडला, टॅक्सीत विसरलेली बॅग तासाभरात शोधण्यात पोलिसांना यश

हेही वाचा – “उद्या चित्रपटउद्योग राज्याबाहेर गेला तर…”, गोरेगाव फिल्मसिटीत खड्ड्यांचं साम्राज्य पाहून मनसेचा संताप, म्हणाले “ग्लॅमर दिसलं की…”

राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून मोर्चाचे नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर करणार आहेत. या मोर्चात मुंबईसह राज्यभरातील गिरणी कामगार मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. सोडतीमधील विजेत्या गिरणी कामगारांना वेळेत घरांचा ताबा द्यावा, पाच हजार घरांची सोडत काढावी आणि दीड लाख गिरणी कामगारांच्या घरांसाठी ठोस धोरण आखावे या मुख्य मागण्यांसाठी हा मार्चे काढण्यात आला आहे.