मुंबई : मागील काही दिवसांपासून वाढ झालेल्या मुंबईतील किमान तापमानाच्या पाऱ्यात शुक्रवारी घट झाली. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा गारवा अनुभवता येणार आहे. सांताक्रूझ येथे शुक्रवारी १६.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील किमान तापमानाचा पारा चढा राहिल्याने पहाटेचा गारवा नाहीसा झाला होता. मुंबई शहर आणि उपनगरांतील नागरिकांना सध्या उकाडा सोसावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानातही वाढ झाली आहे. दरम्यान, मुंबईत दोन दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी किमान तापमानात ४ अंशानी घट झाली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी २१.५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात १६.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे मुंबईत येत्या काही दिवसांत चांगलाच गारवा अनुभवता येणार आहे. कमाल तापमानाच्या पाऱ्यातही शनिवारीपासून घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत कमाल तापमान ३० – ३२ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होणार आहे.

Patients of cold cough fever in every house of Nagpur
नागपुरात घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण… तापमान बदलामुळे…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
Fire at mahakumbh
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात पुन्हा भीषण अग्नीतांडव; १५ टेन्ट आगीच्या भक्ष्यस्थानी!
mumbai temprature today
Mumbai Temprature: मुंबईत तापमान सामान्य पातळीच्याही खाली, पण गारवा अल्पकाळासाठीच; वाचा काय आहे हवामान विभागाचा अंदाज!
Huge displeasure among passengers over ST fare hike Mumbai news
एसटीच्या भाडेवाढीबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी

हेही वाचा – … आणि दुर्मिळ गिधाडाने पुन्हा आकाशात झेप घेतली, युरेशियन ग्रिफॉन जातीच्या गिधाडावर यशस्वी उपचार

हेही वाचा – ठाणे महापालिकेची सुमारे चार हजार अनधिकृत फलकांवर कारवाई, तर ७६ गुन्हे दाखल

डिसेंबरमध्ये उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचे प्रवाह मागील दोन आठवड्यांपासून खंडीत झाले होते. याचाच परिणाम म्हणून राज्यातील तापामानात चढ – उतार होत आहे. दरम्यान, पुढील दोन – तीन दिवसांत राज्यातील किमान तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील अनेक भागात शुक्रवारी किमान तापमानात घट झाली असून ही घट पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Story img Loader